Shyamkumar Barve Lok Sabha Winner: रामटेकच्या गडावर काँग्रेसचा झेंडा, पारवेंच्या विरोधातील लढाई बर्वेंनी जिंकली

Ramtek Lok Sabha Election Result 2024: भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर शिवसेनेचा खासदार रामटेकमधून निवडूण येतो असा दावा भाजपच्यावतीने केला जात होता. हा भाजपला सोडाण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र शिंदे जुमानले नाहीत. मात्र उमेदवार बदलला आणि हीच चूक महायुतीला भोवली.
Shyamkumar Barve
Shyamkumar BarveSarkarnama

Ramtek Lok Sabha Election Result 2024: महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये झालेल्या अतिशय चुरशीच्या सामान्यात रामटेकच्या गडावर महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे. यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

रामटेकमध्ये शिवसेनेचा उमेदवार आपल्या बळावर निवडूण येतो हा भाजपचा भ्रमसुद्धा आता दूर झाला आहे. रामटेक लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात आतापर्यंत पाच वेळा शिवसेनेचा उमेदवार निवडूण आला होता. खासदार कृपाल तुमाने हे सलग दोन वेळा येथून निवडूण आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले.

दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर शिवसेनेचा खासदार रामटेकमधून निवडूण येतो असा दावा भाजपच्यावतीने केला जात होता. यावेळी हा मतदारसंघ भाजपला सोडाण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र शिंदे जुमानले नाहीत. मात्र उमेदवार बदलला. ही चूक महायुतीला भोवली.

दुसरीकडे काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांची उमेदवारी निश्चित केली होती. माजी मंत्री सुनील केदार यांनी ही निवडणूक खाद्यांवर घेतली. रश्‍मी बर्वे यांचे जातप्रमाणत्र अवैध ठरल्यानंतर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली.

Shyamkumar Barve
Uddhav Thackeray On BJP : 'भूल चुका हूँ उन लोगों को जिनको गलती से चुन लिया था !' ठाकरेंनी फटकारले..

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये येथून लढण्यास इच्छुक होते. मात्र केदारांनी त्यांच्या नावाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी बंडाचे निशान फडकावले. वंचित बहूजन आघाडीने त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे येथे अतिशय चुरशीचा सामना होईल अशी अपेक्षा वर्तविली जात होती. मात्र मतदारांनी आयात केलेल्या पारवे यांना नाकारले. केदारांचे समर्थक बर्वे यांना डोक्यावर घेतले.

एकोणीसाव्या फेरीअखेर महायुतीचे राजू पारवे यांना 4 लाख 38 हजार 287 तर महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांना 5 लाख 59 हजार 545 मते पडली होती. बर्वे यांनी 76 हजार 151 मतांनी आघाडी घेतली आहे. आता अवघ्या दोन फेऱ्यांमध्ये ही आघाडी मोडणे अवघड असल्याने बर्वे यांच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष केला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com