Gadchiroli Naxal : अत्यंत घातक माओवादी हल्लाही परतावून लावण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रांसह कवायत

IPS Rashmi Shukla : पोलिस महासंचालकांसह सर्वच अधिकाऱ्यांनी तयार केला सिमावर्ती भागासाठी खास प्लान. लोकसभा निवडणुकीत मतटक्का वाढविण्यावर जोर. सहजपणे न दिसणारी हत्यारेही सज्ज
IPS Rashmi Shukha in Gadchiroli.
IPS Rashmi Shukha in Gadchiroli.Sarkarnama
Published on
Updated on

Gadchiroli Naxal : पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे गेल्या काही दिवसांपासून बिळात लपलेले माओवादी ऐन निवडणुकीच्या काळात डोके वर काढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील माओवादग्रस्त अनेक गावे छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सिमेला लागून आहेत. अशात गडचिरोलीत घातपात केल्यानंतर जंगलमार्गे माआवोदी या दोन राज्यांमध्ये पळून जातात. बरेचदा लगतच्या गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात शिरतात. माओवाद्यांची ही सवय पाहता लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिसांनी गडचिरोलीला लागून असलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगड, महाराष्ट्र-तेलंगण सिमेवर असलेल्या दुर्गमातील दुर्गम भागांमध्ये पोलिस ठाण्यांचे व ‘आऊटपोस्ट’चे नेटवर्क रातोरात उभारले आहेत.

लोहखाणप्रकल्पामुळे माओवाद्यांकडून विरोध होत असलेल्या तोडगट्टाजवळ तर काही तासातच पोलिस स्टेशनची उभारणी झाली. चौफेर नाकाबंदी झाल्याने सध्या गडचिरोलीतील माओवादी कॅडर चांगलेच चवताळले आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला मनसुबा साध्य करण्यासाठी ते सध्या भूमिगत राहून व्यूहरचना करीत आहेत. ही कुणकुण लागल्यामुळे आता राज्य पोलिस दलाने गडचिरोलीसह शहरी माओवादावर पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्याच्या भरवश्यावर चालणारे नक्षल विरोधी अभियानाचे पोलिस महानिरीक्षक पदावर त्यामुळेच पूर्णवेळ अधिकारी म्हणून संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीसोबतच गडचिरोलीत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दौरे सुरू झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

IPS Rashmi Shukha in Gadchiroli.
Gadchiroli Naxal : एकाच महिन्यात महासंचालक रश्मी शुक्ला पुन्हा गडचिरोलीत

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला याच कारणांमुळे सातत्याने गडचिरोलीचा दौरा करीत आहेत. पोलिस महासंचालक झाल्यानंतर शुक्ला अनेकदा गडचिरोलीत आल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्याच्या गुप्तचर विभागाचे (SID) आयुक्त शिरीश जैन देखील सोबत होते. वरकरणी नेहमीप्रमाणे हा सरकारी दौरा वाटू शकतो. परंतु तसे अजिबातच नाही. गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मंत्री गडचिरोलीचे दौरे करीत आहेत यात अनेक आयएएस, आयपीएस अधिकारीही आहेत. हा काही त्यांचा ‘टाइमपास’ दौरा नाही. माओवाद्यांनी दहशत मोडीत काढत गडचिरोलीतील मतटक्का वाढविण्यासाठीची ही ‘स्ट्रॅटजी’ आहे.

महासंचालक रश्मी शुक्ला, एसआयडीचे आयुक्त शिरीश जैन, महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी भामरागड आणि तत ‘रेडअलर्ट’वर राहणाऱ्या मन्नेराजाराम येथे सी-60 कमांडो, गडचिरोली पोलिस व सुरक्षा दलांची ‘स्टॅण्ड टू ड्रिल’ घेतली. ही कवायत खास प्रसंगासाठी केली जाते. एखादा प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्राणघातक हल्ला ज्यावेळी दहशतवादी किंवा माओवादी करतात त्यावेळी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जी अत्याधुनिक स्वयंचलित शस्त्रास्त्र, दारूगोळा, मनुष्यबळ, हवाई सुरक्षा, सैन्यदलाची मदत ज्यावेळी घेतली जाते तशा प्रसंगाची ही चाचणी असते. रश्मी शुक्ला यांच्यासह गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांनी माओवादी कारवायांच्या दृष्टीने ‘पीन पाइंट’ असलेल्या ठिकाणांवरील जवानांच्या तैनातीची पाहणी केली.

IPS Rashmi Shukha in Gadchiroli.
Gadchiroli Naxal : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवादी राजेश्वरी ऊर्फ कमलाला अटक

गडचिरोलीतील पोलिसांचे ‘इन्फर्मेशन नेटवर्क’ आणि राज्य गुप्तवार्ता विभागाकडे असलेल्या माहितीचे यावेळी ‘क्रॉस व्हेरीफिकेशन’ही करण्यात आले. माओवाद्यांना मिळणारी रसद, त्यांचे खबरे यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या व्यूहरचनेचाही आढावा घेण्यात आला. माओवादी केवळ गडचिरोली किंवा देशाच्या काही विशिष्ट भागातच घातपात घडवितात असे नाही. देशाच्या अनेक शहरी भागात आता माओवाद्यांचे ‘स्लीपर सेल’ कार्यरत आहेत. पंजाब, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही शहरी भागात होणाऱ्या अनेक हिंसक कारवायांमागे ‘अर्बन नक्षल’ चळवळीतील ‘मास्टर माइंड’ कार्यरत असतात. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या सततच्या दौऱ्यातून महाराष्ट्र व केंद्र सरकार एकत्रितपणे देशविघातक कृत्यात सहभागी असलेल्यांचे जाळे कवकुवत करण्यासाठी काम करीत आहे. शुक्ला यांच्या समक्ष झालेली ‘स्टॅण्ड टू ड्रिल’ हा याच तयारीचा एक भाग होती.

Edited By : Prasannaa Jakate

IPS Rashmi Shukha in Gadchiroli.
Gadchiroli Naxal : टिटोळातील पोलिस पाटलाच्या हत्येप्रकरणी कट्टर जनमिलिशियास अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com