छत्रपतींचे अनधिकृत पुतळे बसविणाऱ्यांचा पुरूषोत्तम खेडेकरांनी घेतला समाचार...

गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) चरित्रामधून देशभरातील सामाजिक आणि धार्मिक ऐक्य वाढलेले आहे.
Purushottam Khedekar
Purushottam KhedekarSarkarnama
Published on
Updated on

बुलडाणा : राज्यातील (Maharashtra) अनेक शहरे व गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे अनधिकृतपणे बसविण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाद व त्यासाठी आंदोलने होत आहे. महाराजांचा अवमान करणारे हे सर्व प्रकार बंद करावे आणि विदर्भ (Vidarbha) - मराठवाड्याच्या सीमेवर छत्रपतींचे अद्ययावत स्मारक उभारावे, असे म्हणत मराठा सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी छत्रपतींचे पुतळे अनधिकृतपणे बसविणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

१९ फेब्रुवारी २०२२ ही जगभरातील शिवप्रेमींसाठी आनंदाची शिवजयंती आहे. या दिवशी जगभरात तिथी, वार असा कुठलाही वाद न ठेवता, सर्व शिवप्रेमी, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था एकमताने शिवजयंती साजरी करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) चरित्रामधून देशभरातील सामाजिक आणि धार्मिक ऐक्य वाढलेले आहे. दंगली व वादविवाद कमी झालेले आहेत. एकीकडे हा आनंद साजरा करीत असताना गेल्या काही वर्षांपासून गेल्या काही दिवसांपासून काही मंडळी अनधिकृतपणे आपल्या सोयीनुसार गावोगावी किंवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसविण्याचा आटापिटा करीत असल्याचे खेडेकर (Purushottam Khedekar) म्हणाले.

ही जी काही स्पर्धा लागली आहे, ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांना कमीपणा आणणारी व अपमान करणारी आहे. अशा लोकांना माझी विनंती आहे की, त्यांनी यापेक्षा वेगळं शिवस्मारक आपण आपल्या खाजगी जागेत सुरू करावं. या व्यतिरिक्त माझी पालकांना विनंती आहे की आपली मुलं - मुली वर्तमानातील शिवाजी आणि ताराराणी कसे बनतील, याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की अरबी समुद्रातील जे रखडलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक आहे, ते आता जवळपास संपलेले स्वप्न आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आता छत्रपतींचे वडील शहाजी राजे यांचे जन्मस्थळ वेरूळ व आई जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा याच्या मधोमध विदर्भ आणि मराठवाडाच्या सीमेवर औरंगाबाद, जालना आणि बुलडाणा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी २०० -३०० एकर जमीन घेऊन अद्ययावत अस आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक उभं करावं, असेही पुरूषोत्तम खेडेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com