Pusad APMC News : एक्याऐंशीच्या वयातही मनोहररावांचा सहकारावर दबदबा, भाजप-शिंदे गटाला वाव मिळणार?

Manohar Naik : नाइकांचे प्रस्थ असल्याने विरोधकांची डाळ कशी शिजणार?
Manoharrao Naik, Eknath Shinde and Devendra Fadanvis
Manoharrao Naik, Eknath Shinde and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

APMC Election News : शिवसेना-भाजप काळातील दोन वर्ष राजेश कोटलवार यांच्या प्रशासक पदाचा कार्यकाळ वगळता सुरुवातीपासूनच पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री मनोहर नाईक यांचे वर्चस्व राहिलेले आहे. ११ संचालक पदांच्या विविध कार्यकारी संस्थेच्या गटात एकूण ३७ संस्था आहेत. त्यातील मतदारांची संख्या ४३९ एवढी आहे. या सर्व संस्थांमध्ये नाइकांचे प्रस्थ असल्याने विरोधकांची डाळ कशी शिजणार, हा प्रश्‍न आहे. (Ex-minister Manohar Naik remains dominant.)

याबद्दल विरोधकांत चर्चा सुरू आहे. तसेच ग्रामपंचायत गटामध्ये एक हजार ३५ मतदार आहेत. यात सुद्धा मनोहर नाइकांचे पारडे जड आहे. साहजिकच नाइकांचे सामर्थ्य असून विरोधकांना किती वाव मिळेल, यासाठी विरोधक किती बळ लावणार, हे काळच ठरवेल. भाजपचे आमदार निलय नाईक कोणती स्ट्रॅटेजी अवलंबणार, याकडेही शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे. नाईक गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांची नाईक बंगल्यावर वर्दळ वाढत आहे.

दुसरीकडे भाजप, शिवसेना शिंदे गट यांच्याकडील हालचाली सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे येथे वर्चस्व नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे बाजार समितीत वर्चस्व असल्याने महाविकास आघाडीचा प्रश्नच नाही. विशेष म्हणजे खरेदी विक्री संघ व जिनिंग प्रेसिंग निवडणुकीत 'मविआ' पॅटर्न राबविण्यात आलेला नाही.

सहकार क्षेत्रातील दिग्गज माजी मंत्री मनोहर नाईक वयाच्या एक्यांशीतही राजकीय सारिपाटात सक्रिय आहेत. त्यांच्या भूमिकेतूनच पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक निर्णायक ठरणार आहे, असे सद्यःस्थितीतील चित्र आहे. विरोधक किती दम लावणार, किती जागा मिळवणार, हेही या निवडणुकीत स्पष्ट होईल.

Manoharrao Naik, Eknath Shinde and Devendra Fadanvis
APMC Election : हिंगणघाटातही भाजप-कॉंग्रेस साथ-साथ; मागील वेळचे मित्र आता एकमेकांविरोधात !

बाजार समितीच्या कारभारावर नाराजी..

बाजार समितीत मनोहर नाईक यांचे वर्चस्व असले तरी बाजार समितीच्या आधीच्या कारभाराबद्दल एकुणच शेतकरी सभासदांमध्ये तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांना सोयी सुविधा मिळत नाहीत. केवळ दोनच व्यापारी स्पर्धक असल्याने व्यापाऱ्यांची मनमानी चालते.

शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे येथील उत्पादक शेतकरी आपला शेतमाल वाशीम, (Washim) अनसिंग, कारंजा, आर्णी येथील बाजार समितीत विक्रीसाठी पाठवतात. तिथे योग्य भाव तसेच तत्पर सेवा मिळत असल्याने पुसद (Pusad) बाजार समितीतील शेतमाल विक्री कमी झाली आहे.

Manoharrao Naik, Eknath Shinde and Devendra Fadanvis
Amravati APMC Election : महाविकास आणि भाजपमध्ये होणार थेट लढत, तिसरे पॅनल उतरल्यास चुरस वाढणार !

साहजिकच त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. आतापर्यंत संचालकांनी शेतकऱ्यांच्या (Farmers) हिताची बाजू ठामपणे मांडलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. हाच मुद्दा विरोधक हाती घेऊन निवडणुकीत चुरस निर्माण करण्यास प्रयत्नशील राहणार आहे.

त्यामुळे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांना या निवडणुकीत (Election) स्वच्छ प्रतिमेचे व नवीन उमेदवार देण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल. बाजार समितीचा (APMC) विजय मिळवण्यासाठी किंबहुना वर्चस्व राखण्यासाठी मनोहरराव नाईक कोणती पावले उचलणार, याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com