Rajendra Zade आणि Sudhakar Adbale यांच्यात रेस, कोण मिळवणार कॉंग्रेसचे समर्थन?

Congressचा पाठिंबा कुणाला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
Rajendra Zade and Sudhakar Adbale, Nagpur.
Rajendra Zade and Sudhakar Adbale, Nagpur.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Teachers Constituency Election : नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचा काल शेवटचा दिवस होता. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, असे बोलले जात होते. पाच जणांनी उमेदवारी मागे घेतली आहे. पण कॉंग्रेसचा पाठिंबा कुणाला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे समर्थन मिळवणार कोण, हा प्रश्‍न सध्या चर्चिला जात आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) गंगाधर नाकाडे यांना पक्षश्रेष्ठींनी माघार घ्यायला लावल्याने काँग्रेस (Congress) आता कोणाला समर्थन देणार, याकडे लक्ष लागले आहे. या रेसमध्ये विदर्भ (Vidarbha) माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांची नावे आहेत. मात्र विदर्भातील नेत्यांचा कल बघता अडबाले यांची पारडे सध्यातरी जड दिसते. अडबाले यांना कॉंग्रेसचे समर्थन मिळाल्यास कॉंग्रेसने बेईमानी केल्याचा ठपका राजेंद्र झाडे ठेवतील, हे नक्की.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला आता मदत करा, आम्ही तुम्हाला शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मदत करू, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना म्हटले होते. त्याप्रमाणे शिक्षक भारतीने कॉंग्रेसला मदत केली आणि त्यांचे अभिजित वंजारी हे दणक्यात निवडून आले होते. आता कॉंग्रेसने शिक्षक भारतीला मदत न केल्यास त्यांच्यासाठी ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजेंद्र झाडे यांनी अजूनही हार मानलेली नाही आणि कॉंग्रेसचे समर्थन मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहेत.

नाकाडे यांना बदलून अडबाले यांना समर्थन देण्याची मागणी यापूर्वी आमदार सुनील केदार आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेटही त्यांनी घेतली होती. तायवाडे यांनी आपण विदर्भ माध्यमिक शिक्षक संघासोबत असल्याचे सांगून यापूर्वीच बंडाचा इशारा दिला होता. नाशिकमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसलाही हुरूप आला. नाशिकच्या बदल्यात नागपूरची जागा मागण्यात आली. काल दुपारी दोन वाजेपर्यंत वाटाघाटी झाल्यानंतर नाकाडे यांना माघार घेण्याचे आदेश देण्यात आले.

Rajendra Zade and Sudhakar Adbale, Nagpur.
Mahavikas Aghadiकडून चौथा उमेदवार रिंगणात, इटकेलवार म्हणतात आता माघार नाही !

तत्पूर्वी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता. पदवीधर निवडणुकीत केलेली मदत आणि त्यामुळे दिलेला शब्द पाळावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी शेवटपर्यंत प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे झाडे यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे सुधाकर अडबाले यांनीसुद्धा निवडणुकीची तयारी केली होती. महाविकास आघाडीचे समर्थन मिळावे, याकरिता सर्व नेत्यांसोबत भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र आघाडीने शिवसेनेसाठी जागा सोडली.

सेनेने नाकाडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मोठा असंतोष उफाळून आला होता. काँग्रेसचे नेतेसुद्धा अडबाले यांच्यासाठी आग्रही असल्याने त्यांना समर्थन मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र याबाबत अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. ते उद्या बुधवारी भूमिका जाहीर करणार असल्याचे समजते. त्यांनी शिवसेनेला उमेदवारी मागे घेण्यास बाध्य केले. नाना पटोले हे अडबाले यांना समर्थन देण्यास फारसे उत्सुक नसल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com