गालबोट : मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा...

त्याठिकाणी तैनात पोलिसांनी Police कार्यकर्त्यांना तेथून जाण्यास सांगितले. त्यातच काही कार्यकर्त्यांमध्ये Party Workers परस्पर हाणामारी सुरू झाली.
Counting at gadge nagar amravati
Counting at gadge nagar amravatiSarkarnama
Published on
Updated on

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीला आज अखेर गालबोट लागलेच. मतमोजणी आटोपल्यानंतर काही उत्साही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला, मात्र त्यानंतर हा वाद चिघळला व पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यामुळे गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज संत गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृहात झाली. यावेळी मतमोजणीची प्रक्रिया शांततेने पार पडली. संपूर्ण मतदारसंघाचे निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. आतषबाजीसुद्धा करण्यात आली. त्याठिकाणी तैनात पोलिसांनी कार्यकर्त्यांना तेथून जाण्यास सांगितले. त्यातच काही कार्यकर्त्यांमध्ये परस्पर हाणामारी सुरू झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला. हे पाहून बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे त्याठिकाणी आले.

काही वेळातच पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला. परिसरातील दुकानेसुद्धा बंद करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचासुद्धा प्रयत्न केला. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे गाडगेनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी संपूर्ण परिसरात मार्च केला.

चोरटाही घुसला

ही सर्व भानगड सुरू असताना त्या गर्दीत एक चोरटा घुसला आणि त्याने नेत्यांचे पाकीट मारण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी चोरट्याला चांगलाच चोप दिला. इकडे काही कार्यकर्ते आणि पोलिसांमधील वाद चांगलाच पेटला. आमदार बळवंत वानखडे आणि बबलू देशमुख यांनी पोलिसांना समजावून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण त्यानंतर काही वेळ वाद नियंत्रणात आला नाही. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना तेथून पांगविले आणि परिसर रिकामा केला. यावेळी केलेल्या लाठीचार्जचा फटका बबलू देशमुख यांनाही बसल्याची माहिती आहे.

Counting at gadge nagar amravati
पुढील महिन्यात सुरू होणार ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@अमरावती’

निकाल लागेपर्यंत सर्वकाही सुरळीत सुरू होते. पण निकाल लागल्यानंतर विजयी झालेल्या उमेदवारांची काही कार्यकर्त्यांना अतिउत्साह दाखवला. पोलिस त्यांना समजावत असताना काही गैरसमज झाली आणि त्यातून वाद निर्माण झाला, असे सांगण्यात येते. या राड्यादरम्यान ‘आम्ही पोलिस प्रशासनाला सहकार्य करणारे लोक आहोत’, असे आमदार वानखडे यांनी पोलिसांना सांगून त्यांची समजूत काढली. त्यानंतर कुठे हा वाद थोडा शमला. पण त्यानंतर पोलिसांनी पूर्ण परिसर रिकामा केला आणि त्यानंतर येथे वादळानंतरची शांतता जाणवत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com