Lok Sabha Election : 'इंडिया' आघाडी सत्तेसाठी हपापलेली; विखे पाटलांची सडकून टीका

Radhakrishna Vikhe Patil On India Alliance : भाजपचे मंत्री विखे पाटील यांची 'इंडिया' आघाडीवर सडकून टीका...
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठांनी नुसता शेतकऱ्यांना सल्ला न देता प्रयोग करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे महसूलमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आयोजित कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने ते अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी 'इंडिया' आघाडीवरही सडकून टीका केली.

Radhakrishna Vikhe Patil
Sanjay Gaikwad News : "तुम्हाला पदराखाली घेतलं..", शिवसेना आमदाराकडून संजय राऊत टार्गेट

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे तीन दिवसीय ऍग्रोटेक कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आज या प्रदर्शनाचा समारोप होता यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित होते. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कृषी विद्यापीठ आणि सरकार यांनी मिळून राज्यातील शेतकरी आत्महत्या कशा रोखता येतील त्यासाठी प्रयत्न करायला हवा. तर कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना केवळ सल्ला अथवा उपदेश न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष केलेले संशोधन कसं शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ज्यामुळे शेतीतील उत्पादन वाढेल आणि आत्महत्या कमी करता येईल. यामध्ये विद्यापीठ आणि सरकारने हातात हात घालून काम करण्याची गरज आहे, असेही विखे पाटील म्हणाले.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदारकी लढवण्यासाठी पक्षाची जी भूमिका असेल ती मला मान्य असल्याचे विखे पाटील म्हणाले. 'इंडिया' आघाडी म्हणजे सत्तेच्या लालचेने एकत्र आलेले लोक आहेत. हे कधीच समोर आले नाही. यांच्याकडे कोणताही किमान समान कार्यक्रम नाही. देशाच्या भवितव्यचा विचार नाही. केवळ सत्तेसाठी हपापलेली ही आघाडी असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

Radhakrishna Vikhe Patil
Sunil Kedar : पुणे,चंद्रपूरनंतर आता सावनेरच्या पोटनिवडणुकीवर प्रश्नचिन्ह? केदारांची आमदारकी गेल्याने चर्चेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com