Sunil Kedar
Sunil Kedar Sarkarnama

Sunil Kedar : पुणे,चंद्रपूरनंतर आता सावनेरच्या पोटनिवडणुकीवर प्रश्नचिन्ह? केदारांची आमदारकी गेल्याने चर्चेत

Saoner Constituency : केदार यांना पाच वर्षांचा तुरुंगवास...
Published on

Nagpur News : बँक घोटाळा प्रकरणी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याने काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या सावनेर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत पुढील आठवडाभरात प्रशासनाकडून याबाबत तयारी सुरू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केदार (Sunil Kedar) यांना नागपूर (Nagpur) जिल्हा बँक रोखे घोटाळ्यात पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची आमदारकी लगेच रद्द करण्यात आली आहे. केदार यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. पण त्यांची आमदारकी रद्द झाल्याने सावनेर मतदारसंघाची (Saoner Constituency) जागा रिक्त झाली आहे.

Sunil Kedar
Sanjay Shirsat News : "महायुतीला लोकसभेच्या 45 जागा जिंकणं अवघड नाही, राज ठाकरे..." शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

निवडणूक होणार की नाही?

पुण्यात गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. चंद्रपूर लोकसभेचे जागाही रिक्त आहे. पण निवडणूक आयोगाकडून या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक घेतली नाही. पुण्याची निवडणूक घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच आदेश दिले आहेत. हे आदेश देताना न्यायालयाने आयोगाला फटकारले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्याची निवडणूक घेण्याबाबत आयोग सकारात्मक नसल्याने सर्वोच्च न्यायालयात निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसोबतच पुण्याचीही निवडणूक होईल, अशी दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी तयारीही सुरू केली आहे.

Sunil Kedar
Amol Kolhe News: अजितदादांना 'आव्हान' देणार नाही तर 'आवाहन' करणार

सावनेरची निवडणूक होणार की नाही, याबाबत संभ्रम वाढला आहे. ही निवडणूक झाल्यास भाजप त्याचा फायदा घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाऊ शकतात. केदार यांच्या बँक घोटाळ्यामुळे त्यांच्याविरोधात वातावरण तयार केले जाऊ शकते. सध्या भाजपसाठी अनुकूल स्थिती तयार झाल्याचा दावाही पक्षीय पातळीवर केला जात आहे.   

Sunil Kedar
Supriya Sule On BJP: 'आम्ही सतरंजीही उचलायला तयार असतो...'; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com