Rahul Gandi News : उच्च न्यायालयाची प्रतीक्षा न करताच द्वेषातून केलेली कारवाई !

Congress : त्यांना दोन वर्षांची शिक्षा दिली.
Prakash Ambedkar and Rahul Gandhi
Prakash Ambedkar and Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress Leader Rahul Gandhi News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची कारवाई भाजपने द्वेषभावनेतून केली असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. (He was sentenced to two years)

मोदी नावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून सुरत येथील न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांची शिक्षा दिली. या निर्णयाला वरच्या कोर्टात अर्थात उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी न्यायालयाने वेळही दिला आहे. त्यानंतर या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार असल्याचे राहुल गांधी यांनी जाहीर केले होते.

त्यामुळे उच्च न्यायालय या निर्णयाला स्थगिती देते काय, याची प्रतीक्षा न करताच केंद्र सरकारतर्फे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. ही कारवाई म्हणजे भाजपने द्वेषभावनेतून केलेली कारवाई असल्याची प्रतिक्रिया ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

केंद्र सरकारने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेले हे राजकारण असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे. या देशात कोणी जनतेचा आवाज उचलू नये, आपल्याविरूद्ध बोलू नये, असाच त्यांचा डाव आहे. हा सारा प्रकार संतापजनक असून, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या निर्णयाचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त होतो आहे. काँग्रेसने आता रस्त्यावर उतरून या निर्णयाचा रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

Prakash Ambedkar and Rahul Gandhi
Prakash Ambedkar : न्यायालयाला निवडणूक आयोगाचा निकाल तपासण्याचा अधिकार; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

अकोल्यात झाले आंदोलन..

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात होत असलेल्या कारवाईचे पडसाद गुरुवारी अकोल्यात उमटले. महानगर काँग्रेसच्यावतीने सायंकाळी स्वराज भवन येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत भाजप व केंद्र सरकारचा निषेध नोंदवीत स्वतःला अटक करून घेतली. पोलिसांनी यावेळी आंदोलनकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

हुकूमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजप खासदार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपी काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षड्यंत्र रचले असल्याचे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Prakash Ambedkar and Rahul Gandhi
Rahul Gandhi News : देशात खरे बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय; खरगेंची भाजपवर निशाणा

अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याचे पडसाद अकोल्यात (Akola) गुरुवारी उमटले. भारतीय जनता पक्षाच्या या षड्यंत्राविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलेल्या सूचनेनुसार अकोला महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने सायंकाळी स्वराज भवन येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले

या आंदोलनात काँग्रेसचे (Congress) महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते साजीद खान पठाण, डॉ. झिशान हुसेन, विवेक पारस्कर, निखिलेश दिवेकर, मोहम्मद इरफान, डॉ.सुभाष कोरपे, शेख नावेद, आकाश कवडे, अंकुश तायडे, फिरोज गवली, शेख अब्दुल्ला, सचिन तिडके, मुजाहिद खान, मो शारिक, अभिजित तवर, रब्बानी शाह, ओम अमानकर, अंकूश पाटील, जमील भाई, विनोद मराठे, जितू वानखडे, इस्माईल ठेकेदार, सुनील वानखडे, तेजस वानखडे, सालीम आली आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com