Sachin Ahir On Irshalwadi Incident: ...नाहीतर इर्शाळवाडीचेही ‘नेमेचि येतो पावसाळा...’, असे होईल !

Irshalwadi landslide : २२८ लोकांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून ८९ लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
Bhai Jagtap, Chandrakant Patil and Sachin Ahir
Bhai Jagtap, Chandrakant Patil and Sachin AhirSarkarnama
Published on
Updated on

Raigad Khalapur Irshalgad Landslide Live Update : रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे डोंगराचा भाग कोसळून मोठी दुर्घटना झाली. यामध्ये १८ घरे अद्यापही दरडीखाली आहेत. एकूण २२८ लोकांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून ८९ लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेसंदर्भात विधान परिषदेत आज (ता. २०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन केले. (Deputy Chief Minister Ajit Pawar made a statement in the morning)

यासंदर्भात विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी निवेदन केले. या दुर्घटनेवर चित्र स्पष्ट झाल्यावर वेगळी चर्चा करू, असे फडणवीसांनी म्हटल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला सांगितले. पण विरोधी बाकावरील सदस्यांनी याला विरोध केला. सचिन अहीर म्हणाले, एक-दोन दिवस गेल्यावर त्याचे गांभीर्य राहणार नाही. त्यामुळे चर्चा आजच झाली पाहिजे. पण चंद्रकांत पाटलांनी सांगितल्यानुसार या विषयावर आज चर्चा झालीच नाही.

यापूर्वी माळीणला अशीच दुर्घटना घडली होती. तेव्हा डोंगरमाथ्यावर राहणाऱ्या लोकांसाठी काय करावे, यावर भरपूर चर्चा झाली. कृती मात्र झालीच नाही. हे म्हणजे ‘नेमेचि येतो पावसाळा...’, असे झाले. इर्शालवाडी दुर्घटनेनंतरही असेच होऊ नये, म्हणजे झालं, असे म्हणत सचिन अहीर यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत असताना एका जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती असल्याचेही अहीर म्हणाले.

खेड्यापाड्यांसाठी विशेष निधी निर्माण केला पाहिजे. एकट्या रायगड जिल्ह्याचा हा विषय नाही. राज्यभराचा (Maharashtra) विषय आहे. सर्व कामकाज थांबवून या विषयावर चर्चा झाली पाहिजे. जेथे दुर्घटना झाली, तेथे रस्त्यावरून पायी पोहोचायला दीड तास लागतो. तेथे सायकलही जाऊ शकत नाही. हृदयद्रावक घटना पुन्हा एकदा कोकणात घडली आहे. घटना झाल्यावर खूप बोलतो, खूप काम करतो, मदत पोहोचवतो. निष्कर्ष काढतो पण पुढे काय करतो, असा सवाल भाई जगताप यांनी केला

Bhai Jagtap, Chandrakant Patil and Sachin Ahir
Food Supply at Irshalwadi Landslide: दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करणार!

अशा दुर्घटना झाल्यावर कमिटी तयार होते. माळीणच्या घटनेनंतरही कमिटी तयार झाली होती. धोकादायक गावे, वाड्यांची यादी तयार झाली होती. पण इर्शाळवाडीचे नाव त्या यादीत नव्हतेच. काळानुरूप वातावरणात मोठा बदल झाला आहे. पावसाचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. वारंवार त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अतिवृष्टी इतकी भयावह झाली. त्याला ढगफुटी हे नाव पुढे आपण दिलं. बरेच लोक मलब्याखाली दबलेले आहेत.

एनडीआरएफने काही लोकांचा जीव वाचवला आहे. तेथे मशीनरी नेणे शक्य नाही. सरकारने (Government) अशी यंत्रणा तयार केली पाहिजे, की अशा घटनांमध्ये तात्काळ उपाययोजना कायमस्वरुपी असली पाहिजे. नातेवाइकांना मदत देणार हा भाग वेगळा. पण तात्काळ चर्चा होणे गरजेचे आहे. दोन्ही बाजूंचा विचार करून सक्षम यंत्रणा तयार झाली पाहिजे. या दुर्घटनेवर होणारी चर्चा वांझोटी ठरू नये, अशी अपेक्षा भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी व्यक्त केली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com