Lok Sabha Election 2024 : 'स्वाभिमानी'ने सोडली तुपकरांसाठी जागा, पण...

Ravikant Tupkar : बुलढाण्यात लोकसभा निवडणुकीत रंगत येणार...
Raju Shetti & Ravikant Tupkar.
Raju Shetti & Ravikant Tupkar.Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana : राज्यातील सहा जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासह राज्यातील सहा मतदार संघांचा यात समावेश आहे. हातकणंगले मतदारसंघातून स्वतः शेट्टी तर बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र, रविकांत तुपकर हे स्वाभिमानीच्या तिकिटावर लढणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. सर्वच पक्षांकडून आता उमेदवारीसह मतदारसंघही ठरवले जात आहेत. अनेकांनी लोकसभा निवडणुकीसाठी मोट बांधली आहे. लहान पक्षांपासून राष्ट्रीयपक्षापर्यंत सर्वांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही त्यांची संघटना राज्यातील सहा जागांवर लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

Raju Shetti & Ravikant Tupkar.
Buldhana : राज्यभरात खळबळ उडविणाऱ्या खामगावातील जीएसटी प्रकरणात राजकीय उडी

कोल्हापूर येथे त्यांनी ही घोषणा केली आहे. सहा जागांमध्ये हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. या सहा जागांपैकी शेट्टी स्वतः हातकणंगलेची जागा लढविणार आहेत. बुलढाण्याची जागा रविकांत तुपकर यांच्यासाठी सोडण्यात आली आहे. एकीकडे तुपकर यांच्यासाठी राजू शेट्टी यांनी बुलढाण्याची जागा जाहीर केली आहे. दुसरीकडे रविकांत तुपकर यांचे ‘कमळ’ हाती घ्यायचे की ‘मशाल’ हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मध्यंतरीच्या काळात तुपकर भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगली होती. तुपकरांबाबत भाजप नेतृत्वाला आशा होती. मात्र त्यांची व उद्धव ठाकरे यांची बैठक झाल्यानंतर भाजप नेतृत्वाने तुपकरांबाबत सावध भूमिका घेतल्याचे बोलले जाते. स्वतः तुपकर हे जोपर्यंत भाजप नेतृत्वाशी चर्चा करत नाही, तोपर्यंत तुपकरांना निमंत्रण द्यायचे नाही, असे भाजपच्या पातळीवर निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटांकडूनही तुपकरांना तिकीट मिळते का, हे पाहावे लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशात तुपकर यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्यासाठी स्वाभिमानी पक्षाने जागा राखीव ठेवली आहेत. त्यानंतरही त्यांना एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाचे सहकार्य लागणार आहे. त्यामुळे हे राजकीय सहकार्य तुपकरांना कोण देणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. आपल्या आक्रमक आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले रविकांत तुपकर यांनी अलीकडेच कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले. राज्यव्यापी आंदोलन करणारे तुपकर यांच्या या आंदोलनात कुठेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे बरीच चर्चा झाली.

तुपकरांनी स्वाभिमानी संघटनेशी फारकत घेतली का? हा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यानंतर ते स्वत:चा पक्ष काढणार असल्याची चर्चाही रंगली. आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण आंदोलनात त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना या नावाचा वापर केला नाही. त्यामुळे तुपकर हे स्वाभिमानीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार की आणखी कोणत्या पक्षाचे तिकीट त्यांना मिळते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Raju Shetti & Ravikant Tupkar.
Buldhana : सरकारला आता शेतकऱ्यांचा इंगा दाखवणार, विधान भवनावरच धडक देणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com