Buldhana : राज्यभरात खळबळ उडविणाऱ्या खामगावातील जीएसटी प्रकरणात राजकीय उडी

Pulses Traders : सरकारची बदनामी झाल्याचा आमदार आकाश फुंडकर यांचा आरोप
GST Bhavan Khamgaon.
GST Bhavan Khamgaon.Sarkarnama

Khamgaon : राज्यभरात डाळ व्यापाऱ्यांनी दीड लाख कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याचा आरोप सहायक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे. डाळ व्यापाऱ्यांना वाचविण्यासाठी जीएसटी विभागातील काही वरिष्ठ अधिकारी काम करीत असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. आता या प्रकरणात भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी उडी घेतली आहे. सरकारची बदनामी करणाऱ्या सहायक आयुक्तांची त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील जीएसटी विभागात एकापाठोपाठ एक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. दालमिल कंपनीचा थकित कर कमी करण्यासाठी खामगाव येथील जीएसटी अधिकाऱ्याला अडीच लाख रूपयांची लाच देताना मलकापूर येथील दालमिल व्यापाऱ्याला जालना अॅन्टी करप्शन ब्यूरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 20 डिसेंबरला खामगाव जीएसटी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर व्यापार क्षेत्रात खळबळ उडाली.

GST Bhavan Khamgaon.
Buldhana : एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा कळस.. धावत्या एसटीची दोन चाके निखळली

या प्रकरणानंतर जीएसटी विभागात खळबळजनक आरोप करण्यात आले. जीएसटी बुडविणाऱ्या डाळ व्यापाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी सहाय्यक आयुक्त डॉ. चेतनसिंग राजपूत यांनी केली. डाळ व्यापाऱ्यांना वाचविण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी काम करीत आहेत. बुलढाणा जिल्हा राज्यकर उपायुक्त मारोतराव राठोड यांच्यानंतर त्यांच्या जागी प्रवीण भोपळे यांना भ्रष्टाचार दाबण्यासाठी वरिष्ठांनी पदभार दिल्याचा धक्कादायक आरोपही राजपूत यांनी केला. एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या प्रकरणामुळे राज्यातील जीएसटी विभागात सुरू असलेला गैरप्रकार चव्हाट्यावर येत आहे. अशात कर बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी यांना वाचविण्यामध्ये सरकारला आणि जीएसटी विभागाला नेमका कोणता रस असू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी जीएसटी प्रकरणात आता उडी घेतली आहे. शासनाची बदनामी करण्याचा अधिकार चेतनसिंह राजपूत यांना नाही. राजपूत यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेया प्रकरणी आता काय कारवाई होते. याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्यावर्षी फेब्रुवारीतही वस्‍तू व सेवा कर चुकविण्यासाठी एका उद्योजकाकडून बनावट प्रतिज्ञापत्र, बोगस दस्‍तऐवज आणि नकली कागदपत्रांचा आधार घेण्यात आल्‍याचे कटकारस्‍थान खामगावात उघड झाले होते. तब्‍बल 1 कोटी 78 लाख 21 हजार 35 रुपयांच्‍या करचुकवेगिरी प्रकरणी एमआयडीसीतील एका कंपनीविरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून खामगावातील हे कार्यालय चर्चेत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

GST Bhavan Khamgaon.
Buldhana Politics : बुलढाणा तापलं; एकाच गावात राहणाऱ्या तुपकर अन् आमदार गायकवाडांमध्ये जुंपली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com