
Nagpur, 09 June : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजपने चोरली असा आरोप एका लेखाद्वारे केला होता. त्याला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना आपल्या कामठी मतदारसंघाचा अभ्यास करण्याचे आवाहन केले होते. त्याला काँग्रेसचे कामाठीतील पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत १२ हजार मतदारांची नोंदणी आयोगाने कशी काय केली, अशी विचारणा करतानाच ‘मध्य प्रदेश, छत्तीसगड व इतर राज्यातील कामगारांना आणून त्यांना मतदार करण्यात आल्याचा थेट आरोप केला. भाजप कशी जिंकली, यासाठी हे एकमेव उदाहरण पुरेसे आहे, असा दावाही भोयर यांनी केला.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजप महायुती सरकारने चोरली. अधिकाऱ्यांसोबत मॅच फिक्सिंग करून विधानसभेचा सामना जिंकल्याचा आरोप एक लेख लिहून केला होता. त्यानंतर काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांनी आरोप करण्यापूर्वी फक्त आपल्या कामठी विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केला असता तरी काँग्रेस का पराभूत झाली, हे त्यांना कळाले असते, असा सल्ला दिला होता.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना कामठी विधानसभा मतदारसंघातून सुमारे १७ हजार मतांची आघाडी मिळाली होती. याच २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत कामठी मतदारसंघात (Kamthi constituency) ४ लाख ६६ हजार २३१ मतदार होते. त्यानंतर पाच महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. या कालावधित ३५ हजार ५३९ मतदार वाढले, ही वाढ कशी झाली, याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना चांगलीच माहिती आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यावेळी २३ हजार मतदार वाढल्याचे सांगण्यात आले होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी सुरू केली. मतदानाच्या तीन दिवस अगोदरपर्यंत १२ हजारांच्या वर मतदारसंख्येत वाढ करण्यात आली, असा दावा सुरेश भोयर यांनी केला आहे.
मतदार नोंदणी करताना कुठल्याच कागदपत्राची मागणी त्यांना करण्यात आली नाही. फक्त आधार कार्ड घेऊन त्यांना मतदार करण्यात आले होते. ते सर्व मतदार परराज्यातील होते. त्यांना मतदार करून भाजपने निवडणुकीत फायदा घेतला आहे, असा आरोप सुरेश भोयर यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.