Bjp News : श्रीरामाच्या पोस्टरबाजीतून भाजप नेत्यांकडून प्रचाराचा धडाका, पक्षश्रेष्ठींचे आदेश धुडकावले!

Akola Bjp Leaders Hoardings Over Ayodhya Ram Mandir : श्रीरामाच्या नावाने भाजप नेत्यांनी केलेली पोस्टरबाजी चर्चेत...
Akola Bjp News
Akola Bjp NewsSarkarnama
Published on
Updated on

Akola Bjp Latest News :

अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात 'पोस्टरबाजी' करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी प्रभू श्रीरामाचा फोटो असलेले पोस्टर लावण्यात आलेले आहेत. श्रीरामाच्या पोस्टरबाजीतून आगामी निवडणुकांच्या 'मतांची पेरणी' मोठ्या प्रमाणात केली जात आहे. पोस्टरबाजीच्या या स्पर्धेत भाजप नेते आघाडीवर आहे.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्येच्या राम मंदिरात उद्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. या भव्य सोहळ्यासाठी देशासह राज्यात विविध कार्यक्रमाचं, उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे अकोल्यातही या सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शहरभर चौका चौकात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

पोस्टरबाजीतही भाजप नेते आघाडीवर असल्याचं दिसत आहे. शहरातील मुख्य चौक हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हायजॅक केले असून लावण्यात आलेल्या पोस्टरवर प्रभू श्रीरामाचा फोटो आणि खाली आपले नाव आणि फोटो लावण्यात आलेले आहेत. या पोस्टरबाजीतून भाजपकडून आगामी Elections प्रचार जोरात सुरू असल्याची चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे.

Akola Bjp News
Nitin Gadkari : पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी सांगितला फंडा !

2024 हे वर्ष निवडणूकीचे वर्ष असणार आहे. या वर्षात लोकसभा, विधानसभा या मोठ्या निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांवर सर्वच पक्षाचे लक्ष आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण निर्मिती केली जात आहे. दुसरीकडे सत्ताधारी मतांची पेरणी करताना दिसत आहेत.

लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या धार्मिक सोहळ्यांवर भाजपकडून विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यात आता अयोध्या येथील सोहळा हा रामजन्मभूमी न्यासाचा कार्यक्रम नसून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम असल्याची टीका काँग्रेससह अन्य विरोधकांनी केली होती.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली आहे. मात्र या पोस्टरबाजीमध्ये सत्तेत सहभागी असलेला शिवसेना शिंदे गट पिछाडीवर आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून शहरात एकही पोस्टर लागले नसल्याची माहिती आहे. तर काँग्रेस- वंचित आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षाचे नेते पोस्टर लावण्यापासून 'चार हात दूर' असल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरबाजीतून भाजपच्या नेत्यांनी निवडणुकांची मोर्चेबांधणी केली. मतदारांना प्रभावित करण्यासाठी विशेष करून नेत्यांवर धार्मिक उत्सवाचे रंग चढले आहेत. त्यामुळे या पोस्टरबाजीतून भाजपच्या नेत्यांना निवडणुकांमध्ये याचा कितपत लाभ होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर लोकार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे राजकारण करू नये आणि राजकीय नेते म्हणून नव्हे, तर रामभक्त म्हणून त्यात सहभागी व्हावे, असे सक्त निर्देश भाजप पक्षश्रेष्ठींनी नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. पण अकोल्यात राजकीय नेत्यांनी जोरदार पोस्टरबाजी करत पक्षश्रेष्ठींचा आदेश धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे.

Akola Bjp News
Maratha Reservation : आता शिक्षकांनीही शोधाव्या लागणार कुणबी नोंदी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com