Ramdas Athawale News : लोकसभेसाठी आठवलेही आग्रही ; महायुतीत पेच ? दोन जागा लढवण्यावर ठाम

Ramdas Athawale Nagpur News : लोकसभेच्या २ जागा तर विधानसभेच्या १० ते १२ जागा द्याव्या, रामदास आठवलेंची मागणी
Ramdar Athawale News
Ramdar Athawale NewsSarkarnama

Nagpur News : आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आरपीआयला जागा मिळाव्या, अशी मागणी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. लोकसभेच्या २ जागा तर विधानसभेच्या १० ते १२ जागा द्याव्या. तसचे आमचे मंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पळवले असल्याची टोला लगावत आठवले म्हणाले, आता तरी आमचा कोटा आम्हाला मिळावा ही अपेक्षा आहे.

आठवले सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आठवले (Ramdar Athawale) म्हणाले, 'लोकसभेच्या 'एनडीए' ३५० जागा जिंकेल, असा आम्हाला विश्वास आहे. आम्हाला २ तरी जागा द्यावा, उत्तर प्रदेशमध्ये रिपब्लिकन पक्ष वाढत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये आमच्या पक्षाला सोबत घ्यावे, अशी आमची मागणी असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

Ramdar Athawale News
Ajit Pawar Kolhapur Sabha : शरद पवारांनंतर आता कोल्हापुरातही अजितदादांची सभा; उत्तर देणार की...

राज्य सरकारमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोबत आहेत. त्यांनी आता इतर कोणत्याही पक्षाला सोबत घेऊ नये. आम्ही गाव तिथे आमची शाखा तयार करणार आहोत. आम्ही सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेणार आहोत.', असे मत त्यांनी व्यक्त केले.

रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. 'सरकारचा सामना करण्याची भूमिका त्यांनी सोडली आहे. हा राहुल गांधी यांचा पळफुटेपणा असल्याचा हल्लाबोल आठवले यांनी केला. लोकांसाठी त्यांनी पदावर राहायला हवे होते. 'इंडिया' नाव विरोधकांनी द्यायला नको होते. आम्ही स्पेलिंग म्हणू 'इंडिया' म्हणू. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचे उमेदवारच नाहीच. त्यांच्यातीस सगळ्यांनाच पंतप्रधान व्हायचे आहे, असा त्यांनी लगावला.

Ramdar Athawale News
BJP Vs Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना भाजप त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन ललकारणार ; 'परिवर्तना'ची दहिहंडी उभारणार

मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगत होतो, आमदार नाराज आहेत. आमच्यासोबत या पण त्यांनी ऐकले नाही. त्यांना आमदार सांभाळता आले नाहीत, असा हल्लाबोल आठवले यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या तोंडून सध्या चांगले वक्तव्य निघत नाहीत, असेही आठवले म्हणाले. संविधान बदलणे असे म्हणणे अयोग्य आहे. पंतप्रधान मोदी यांनी संविधानावर माथा टेकून शपथ घेतलीय. संविधान बदलले जाणार नाही याची काळजी घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

शिर्डी जवळ हरेगाव आहे. तिथे दलित मुलांना मारहाण केली. तिथे मी एक तारखेला जाणार आहे. नगरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तेथे जाऊन आले आहेत. ही घटना दुर्देवी आहे. या घटनेचा मी निषेध करतो. या प्रकरणात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com