BJP Vs Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना भाजप त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन ललकारणार ; 'परिवर्तना'ची दहिहंडी उभारणार

Mumbai Worli Political News : दांडिया, दिवाळी पहाटनंतर आता भाजप वरळीत परिवर्तनाची दहीहंडी भरवणार....
Devendra Fadnavis Vs Aaditya Thackeray
Devendra Fadnavis Vs Aaditya ThackeraySarkarnama

Mumbai : मुंबईतील वरळी मतदारसंघ २०१९ पासून आजपर्यंत अनेकदा चर्चेचा विषय ठरत आला आहे. याच महत्वाचं कारण म्हणजे माजी मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. तेव्हापासून वरळी बालेकिल्ला नेमका कुणाचा? यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही भाजप तसेच शिंदेगटाकडून दहिहंडी उत्सवाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. यात वरळीत दहिहंडी उत्सवाचे आयोजन करून भाजप आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहे.

Devendra Fadnavis Vs Aaditya Thackeray
Mamata Banerjee on Loksabha : भाजपने डिसेंबरमध्येच लोकसभा निवडणुका घेतल्या तर..; ममता बॅनर्जींचे सूचक विधान

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार(Ashish Shelar) दहिहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. दांडिया, मराठमोळी दिवाळी पहाटनंतर आता भाजपने परिवर्तनाची दहीहंडी भरवणार आहे. माजी मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात भाजपकडून 'परिवर्तना'ची दहिहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. या दहिहंडीतून भाजपला ठाकरेंना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन ललकारणार आहे. भाजपकडून वरळीतल्या जांबोरी मैदानात दहीहंडीचं आयोजन करण्यात आल्यामुळे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा भाजपचा प्रयत्न ?

आदित्य ठाकरें(Aaditya Thackeray) च्या वरळी मतदारसंघात भाजप आणि शिंदेंनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यावर्षी भाजपकडून वरळीत परिवर्तनाची दहिहंडी उभारली जाणार आहे. भाजपने तशी तयारी केली असून आशिष शेलार लवकरच यासंदर्भातील सविस्तर माहितीसह घोषणा करणार आहे. गेल्यावर्षी देखील भाजपने जांबोरी मैदानात दहिहंडी आयोजित केली होती. यावर्षी याच मैदानात 'परिवर्तना'ची दहिहंडी करत आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

Devendra Fadnavis Vs Aaditya Thackeray
Solapur Politics : 'होय, दारूविक्रीचे गुन्हे असलेला आमचा पदाधिकारी मला भेटला,पण...'; शंभूराज देसाईंची जाहीर कबुली

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातही त्यांची वर्णी लागली. यानंतर त्यांनी मुंबईवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करताना मुंबई महापालिकेसह आपल्या वरळी मतदारसंघही मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला. पण याचवेळी शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजप प्रणित महायुतीचे सरकार सत्तेत आले.

तेव्हापासून आदित्य ठाकरे शिंदे गटासह भाजप(BJP) वरही तुटून पडले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट चँलेज देताना वरळीतून लढण्याचे आव्हान दिले. हेच शिंदे गटासह भाजपला झोंबले आहे. याचमुळे शिंदे गटासह भाजपही ठाकरेंना घेरण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारीला लागला आहे.

Devendra Fadnavis Vs Aaditya Thackeray
Bachchu Kadu News : बच्चू कडूंनी आरोग्य अधिकाऱ्याला भरला दम ; आशा सेविकांना ऑनलाइन कामाची सक्ती केली तर झोडपून काढणार...

वरळी शिवसेनेचा गड...

वरळी हा गेल्या काही वर्षात शिवसेनेचा गड झाला होता. २०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या सचिन अहिर यांनी हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी सोडला आणि ते तिथून विधानसभेवर निवडून गेले. मात्र,आदित्य ठाकरे भाजपाच्या मतांवर निवडून गेल्याची टीका आशिष शेलार यांच्याकडून नेहमी केली जाते.

५0 हजार गोविंदांना मिळणार विमा कवच

दहिहंडी उत्सवादरम्यान गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात होण्याची शक्यता असते. काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो किंवा गंभीर दुखापत होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. परिणामी अपघातग्रस्त गोविंदांना आणि त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरं जावं लागतं.

Devendra Fadnavis Vs Aaditya Thackeray
Bacchu Kadu on Tendulkar : तारीख ठरली, बच्चू कडू ‘या’ दिवशी पाठवणार सचिन तेंडुलकरला नोटीस !

या अनुषंगाने गोविंदांना विमा संरक्षण देण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून 50 हजार गोविंदांना प्रति गोविंदा रु. 75 चा विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु. 37,50,000 इतका निधी संबंधित विमा कंपनीस अदा करण्यात आला आहे. मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास दहा लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com