Ramdas Athawale Poetry: रामदास आठवलेंनी यवतमाळातही केली शीघ्रकविता, म्हणाले…

Ramdas Athawale Poetry On Chandrayaan 3: निवडणुका महायुतीसोबत लढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
Ramdas Athavale
Ramdas AthavaleSarkarnama

Yavatmal Political News : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले जसे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत, तसेच ते शीघ्रकवी म्हणून देखील तेवढेच प्रसिद्ध आहे. यवतमाळला ते प्रशिक्षण शिबिरासाठी गेले होते. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेथे त्यांनी एक शीघ्रकविता सादर केली. (That is why Narendra Modi has sent Chandrayaan to the moon)

‘भारत देशाचे सर्व साईंटिस्ट आहेत आमची जान, म्हणूनच चंद्रावर पोहोचणार आहे चंद्रयान, आम्हाला आहे सगळ्या गोष्टींचं भान, म्हणूनच नरेंद्र मोदींनी पाठवले आहे चंद्रावर चांद्रयान’, ही कविता सादर करून रामदास आठवले यांनी उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर ते म्हणाले. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीसोबत लढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

रिपाइंला (आठवले गट) चांगल्या जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधक एकत्र आले असून, त्यांनी ‘इंडिया’ हे चुकीचे नाव दिले असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

काल (ता. २२) यवतमाळ येथे प्रशिक्षण शिबिरासाठी आठवले आले होते. ‘इंडिया’तील प्रत्येकच नेत्याला पंतप्रधान व्हायचे आहे, असा टोला रामदास आठवले यांनी यावेळी लगावला. नरेंद्र मोदी हे जगात प्रसिद्ध आहेत. देशातील जनता मोदी यांच्या पाठीशी उभी आहे.

Ramdas Athavale
Ramdas Athavale on 'INDIA' Alliance : रामदास आठवलेंनी ‘असा’ सांगितला ‘इंडिया’चा पूर्ण अर्थ !

मोदी यांच्या सरकारमध्ये लहान पक्षांनाही मंत्रिपदे देण्यात आली. त्यामुळे भाजप हे लहान पक्षांना संपवीत असल्याचा विरोधकांकडून करण्यात येत असलेला आरोप चुकीचा आहे, असे आठवले यांनी सांगितले.

खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आठवले यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली. विरोधकांच्या जागाच निवडून येणार नाहीत. त्यामुळे ऑफर देणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे आमच्याकडे आल्यास त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचे आश्‍वासन आठवले यांनी दिले. शिवसेनेला भाजपने फोडले नाही. तर, उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले.

Ramdas Athavale
Ramdas Athawale On Onion Issue: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकतो कांदा, अन् महाविकास आघाडीचा झाला वांदा !

वैचारिक परंपरेला छेद दिल्याने पक्षफुटीची नामुष्की आली. लोकसभा निवडणुकीत दोन आणि विधानसभा निवडणुकीत १५ जागा मिळविण्याचा रिपाइंचा प्रयत्न आहे. देशभरात करण्यात आलेल्या विकासकामांमुळे मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असा आशावाद केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी व्यक्त केला. आमचा पक्ष आहे, त्यामुळे कोणतीही निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत आल्याने ताकद वाढली आहे. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) राहणार आहेत. विरोधकांकडून करण्यात येणारी चर्चा निरर्थक असल्याचेही रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत दयाल बहादूरे, राजाभाऊ सरवदे, बापूराव कदम, गौतम सोनवणे, सुधाकर तायडे, मोहन भोयर, महेंद्र मानकर, नवनीत महाजन, गोविंद मेश्राम, अश्‍वजित शेळके, राजन वाघमारे आदी उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com