Ramdas Athawale's Poem : `कवी आपले तेच’... आठवलेंच्या रचनेने सर्वांना खळखळून हसवले !

India Alliance : 'इंडिया' आघाडीवर सादर केली चारोळी.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleGoogle
Published on
Updated on

Nagpur Political News : आपल्या आगळ्यावेगळ्या काव्यशैलीने अनेकांना पोट धरून धरून हसायला लावणारे रिपब्लिकन नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना नागपुरातही चारोळी सादर करण्याचा मोह आवरला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशात स्थापन झालेल्या 'इंडिया' आघाडीवर ‘कवी आपले तेच’ असलेल्या आठवलेंनी चारोळी सादर केली. (Poetry presented on the India Alliance)

आठवलेंनी चारोळी सादर करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हंशा पिकला. वेगळ्या पद्धतीची बोलण्याची शैली आणि इन्स्टंट कविता करण्याची प्रतिभा असलेल्या रामदास आठवले यांनी आतापर्यंत आपल्या कवितेतून लोकसभेतील अनेक सदस्यांनाही हसायला भाग पाडले आहे. इतकेच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अनेकदा आठवलेंच्या कवितांवर खळखळून हसलेले आहेत.

आठवले बोलले आणि त्यात कवितेचा समावेश नाही, असे कधीही घडलेले नाही. नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आले असता आठवलेंनी प्रसार माध्यमांची संवाद साधला. आठवले काय बोलतात, यापेक्षा ते कोणती कविता करतात, याकडेच उपस्थितांचे लक्ष होते. अशात कवी आठवलेंनाही मोह आवरता आला नाही. यावेळी 'इंडिया' हा उल्लेख जाणीवपूर्वक आठवले यांनी भारत हा शब्द वापरला.

'भारत हा आपला देश आहे.., भारत हा आमचा वेश आहे..., भारताच्या नावाने.. हा विरोधाचा नाश आहे..'

उपरोक्त चारोळी करत रामदास आठवले यांनी 'इंडिया' आघाडीवर प्रहार केला. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात यापूर्वी झालेली बैठक ही केवळ चहापानावरची बैठक होती, कारण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचा छत्तीसचा आकडा आहे. प्रकाश आंबेडकरांना चहा प्यायला आवडते. त्यासाठी शरद पवार यांच्याकडे गेले होते, असा टोलाही आठवले यांनी लगावला. प्रकाश आंबेडकरांना ‘भारत’ आघाडीत जायचे असेल तर ते जाऊ शकतात. हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे.

पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा न मिळाल्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, मध्य प्रदेशात ताकद नाही. त्यामुळे तेथे भाजपच्या कोट्यातून एकही जागा मिळाली नाही. पण आम्ही राजस्थानमधून सहा ते सात जागांवर उमेदवार उभे करू. जिथे ताकद नाही तिथे उमेदवार उभे करण्यात अर्थ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर मत मांडताना आठवले म्हणाले की, पंतप्रधान खरगे यांच्या पत्राकडे मोदी लक्ष देतील. खरगे यांच्या पत्राला आमचा पाठिंबा आहे. केंद्र सरकार नोकरशाहीचा प्रचारासाठी वापर करत नाही. अग्निवीरांबाबत राहुल गांधींच्या ट्विटवर आठवले म्हणाले की, अग्नीवीर शहिदांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही पेट्रोल पंपासह अनेक योजना दिल्या जातात. राहुल गांधी यांचे ज्ञान कदाचित कमी पडत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Edited By : Atul Mehere

Ramdas Athawale
Ramdas Athawale On Nanded Hospital: नांदेड रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी रामदास आठवलेंचा राज्य सरकारवर निशाणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com