Ramdas Athawale On Nanded Hospital: नांदेड रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी रामदास आठवलेंचा राज्य सरकारवर निशाणा

Political News: नांदेड रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी रामदास आठवले यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयांत अचानक झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षांकडून सध्या महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतापर्यंत केंद्र, राज्य सरकारचे तोंडभरून कौतुक करणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रथमच या प्रकरणावरून राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यातून या रुग्ण बळींचे गांभीर्य एकप्रकारे केंद्र सरकारने घेतल्याची चर्चा आहे.

Ramdas Athawale
Nanded Hospital News: नांदेड रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री 'अ‍ॅक्शन मोड'वर; अधिकारी दोषी आढळल्यास कारवाईचे आदेश

आठवले हे संसदेतच नाही, तर बाहेरही आपल्या स्टाइलने भाजप व त्यातही मोदींवर स्तुतिसुमने उधळतात. त्याजोडीने भाजप सत्तेत असलेल्या राज्यातील महायुती सरकारचेही ते कौतुक करतात. मात्र, या वेळी प्रथमच त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना सरकारवर टीकेचे आसूड ओढले.

"औषधांच्या तुटवड्यामुळे सरकारी रुग्णालयातील मृत्यू ही प्रगतशील राज्याच्या प्रतिमेला शोभणारी बाब नाही. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयांत औषधांच्या तुटवड्यामुळे 45 रुग्णांचा मृत्यू ही अत्यंत दु:खद, वेदनादायक दुर्घटना आहे", असे ते म्हणाले.

सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्युप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मंत्री आठवले यांनी केली आहे. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 35 रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना उघडकीस आल्यानंतर लगेच छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झाला.

45 रुग्णांचा बळी जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या बळींच्या सखोल चौकशीची त्यांनी मागणी केली. तसेच या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच रुग्णालयांची तपासणी करावी, त्यांचे फायर ऑडिटही करावे, सर्व रुग्णालयांना शासनाने पुरेशी औषधे द्यावीत, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, अशा व इतर मागण्याही त्यांनी केल्या आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Ramdas Athawale
Nanded Hospital News: नांदेड रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री 'अ‍ॅक्शन मोड'वर; अधिकारी दोषी आढळल्यास कारवाईचे आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com