Ramtek APMC : सुनील केदार-आशिष जयस्वाल युतीचे खातेही उघडले नाही, विरोधकांचा सहा जागांवर विजय !

BJP : ग्रामपंचायत गटातून भाजप पुरस्कृत पॅनलचे चारही उमेदवार निवडून आले आहेत.
Sunil Kedar, Gajju Yadav, D.M. Reddi and Ashish Jaiswal
Sunil Kedar, Gajju Yadav, D.M. Reddi and Ashish JaiswalSarkarnama
Published on
Updated on

ललित कनोजे

Nagpur District APMC Elections Results : नागपूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ५५ उमेदवार उभे होते. आज (ता. २९) सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असा अंदाज आहे. (All results will be available by 12 noon)

आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, ग्रामपंचायत गटातून भाजप पुरस्कृत पॅनलचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. व्यापारी गट आणि हमाल मापारी गटातून सचिन किरपान पॅनलचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला आहे. सचिन किरपान हे पूर्वी सुनील केदारांचे कार्यकर्ते होते. त्यांच्यापासून फारकत घेत त्यांनी यावेळी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले होते. त्यात त्यांना यश मिळताना दिसत आहे.

कॉंग्रेसचे हेवीवेट नेते, माजी मंत्री, आमदार सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे गटात गेलेले आमदार आशिष जयस्वाल यांनी या निवडणुकीत युती करून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण आत्तापर्यंत लागलेल्या निकालांमध्ये बलाढ्य नेत्यांच्या या युतीला एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे रामटेक बाजार समितीमध्ये त्यांचा सुपडा साफ होणार, असे बोलले जात आहे.

आज शनिवारी (ता. २९) सकाळी स्व.घनशामराव किंमतकर सभागृहात मतमोजणी सुरू झाली आहे. वर्षानुवर्षे नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारणावर दबदबा ठेवणाऱ्या माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांना स्थानिक आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासोबत युती करावी लागली. त्यांनी सहकार पॅनल निवडणुकीत उतरवले आहे. अद्याप तरी त्यांना यश मिळालेले नाहीये.

Sunil Kedar, Gajju Yadav, D.M. Reddi and Ashish Jaiswal
Darwha APMC : ‘मविआ’ विरुद्ध शिवसेनेत (शिंदे गट) घमासान, भाजपला दाखवला बाहेरचा रस्ता !

एके काळी केदारांचे (Sunil Kedar) कट्टर समर्थक असलेल्या सचिन किरपान, मिन्नू गुप्ता यांच्यासारख्या सहकार क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी (Farmers) सहकार पॅनेल मैदानात उतरवले. त्यामुळे आमदार केदारांना ऐनवेळी आमदार जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्याशी सर्व प्रकारचे राजकीय (Political) मतभेद विसरून युती करावी लागली. तसेच या निवडणुकीत (APMC Election) भाजपचे नेते डी. एम. रेड्डी यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी या निवडणुकीत शेतकरी विकास सहकार पॅनलच्या माध्यमातून काँग्रेसचे गज्जू ऊर्फ उदयसिंह यादव यांचेशी युती केली. गज्जू यादव गट आणि किरपान गटाने खाते उघडले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com