Nagpur Congress: 'रामटेक' जिंकल्यानंतर 'झेडपी' सभापतींच्या ऑफिसात झळकला सुनील केदारांचा फोटो

Nagpur Zilla Parishad Chairman office Sunil Kedar Photo: नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर केदारांचे फोटो जिल्हा परिषदेतून काढण्यात आले होते.
Nagpur Zilla Parishad Chairman office Sunil Kedar Photo
Nagpur Zilla Parishad Chairman office Sunil Kedar PhotoSarkarnama

Nagpur News: काँग्रेसने रामटेक लोकसभा मतदारसंघावर झेंडा फडकावल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. लोकसभेच्या निकालानंतर माजी मंत्री सुनील केदार यांचे समर्थक आता आक्रमक झाले आहेत.

नागपूर जिल्हा परिषदेवर (Nagpur Zilla Parishad) काँग्रेसची सत्ता आहे. भाजपच्या तावडीतून जिल्हा परिषद परत काँग्रेसला मिळवून देण्यात केदारांचा मोठा वाटा आहे. रामटेक जिंकल्यानंतर भाजपवर दबाव निर्माण करण्यासाठी कार्यक्रर्त्यांनी जिल्हा परिषदेतील सभापतींच्या कक्षांमध्ये (Sunil Kedar) केदारांचे फोटो लावले आहेत.

त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेत सर्वाधिक समर्थक केदार यांचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींच्या कक्षांमध्ये केदारांचे फोटो लावले आहेत.

लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात आली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ केदारांनी एकहाती महाविकास आघाडीला जिंकून दिला आहे. त्यामुळे पुन्हा केदारांचे फोटो लावण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असली तरी रामटेकमधील पराभव भाजप कार्यकर्त्यांचा चांगलाच जिव्हारी लागला आहे. अनेकांचे मनोबल खचले आहे. केदारांच्या फोटो लावल्या जात असल्याने विरोधी पक्ष काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur Zilla Parishad Chairman office Sunil Kedar Photo
Ajit Pawar: राष्ट्रवादीतील एक आमदार 'फितूर'; खुद्द अजितदादांनीच सांगितलं...

रामटेकच्या विजयानंतर केदारांनी भाजपच्या नेत्यांना आव्हान देणे सुरू केले आहे. भाजपचे आमदार समीर मेघे यांना हिंगणा विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांनी निवडणूक लढण्याचे चॅलेंज दिले आहे. सावनेर हा त्यांचाच मतदारसंघ आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघातही सुमारे साडेसतरा हजारांचे मताधिक्य काँग्रेसच्या उमेदवाराने घेतले आहे. हे तीन मतदारसंघ केदारांच्या अजेंड्यावर सध्या आहेत.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर केदारांचे फोटो जिल्हा परिषदेतून काढण्यात आले होते. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली होती. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय नियमांचा दाखला देत त्यांचे फोटो काढले होते. यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा दाखला दिला होता. त्यामुळे काँग्रेसचा सदस्यांचा नाईलाज झाला होता. केदारांचे फोटो सर्व कक्षातून काढले होते.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com