Ramtek Lok Sabha Result : रामटेकमध्ये केदार ठरणार किंगमेकर अन् भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नापास?

Chandrasekhar Bawankule vs Sunil Kedar : काँग्रेसचा उमेदवार परस्पर जाहीर केला. काँग्रेसच्याही नेत्यांना केदारांशिवाय रामटेक जिंकणे अवघड असल्याची जाणीव असल्याने सर्वच रामटेकपासून लांब राहिले.
Bawankule and Kedar
Bawankule and KedarSarkarnama

राजेश चरपे -

Maharashtra Election Results : रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे विजयाकडे आगेकूच करीत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध माजी मंत्री सुनील केदार यांच्यात राजकीय वर्चस्वाची येथे लढाई सुरू होती. यात केदारांनी बाजी मारली असून ते पुन्हा एकदा किंगमेकर म्हणून समोर आले.

नागपूर जिल्ह्यातील केदारांचे राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी संपूर्ण भाजप(BJP) कामाला लागली होती. यापूर्वी सावनेर विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभूत करण्यात प्रयत्न भाजपने केला होता. मात्र भाजपला यश येताना दिसत नाही. अलीकडे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी न्यायालयाने त्यांनी दोषी ठरवल्याने आमदारकी रद्द झाली आहे.

Bawankule and Kedar
Vidarbha Lok Sabha Election Result 2024 Live: शिकारी खुद यहाँ शिकार बन गया! रामटेक यवतमाळमध्ये शिंदे घायाळ

मात्र केदारांनी(Sunil Kedar) हार मानली नाही. रामेटक लोकसभेत कुठल्याही परिस्थिती भाजपला पराभूत करण्याचा विडा त्यांनी उचलला होता. काँग्रेसचा उमेदवार परस्पर जाहीर केला. काँग्रेसच्याही नेत्यांना केदारांशिवाय रामटेक जिंकणे अवघड असल्याची जाणीव असल्याने सर्वच रामटेकपासून लांब राहिले.

केदारांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्य रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिला. त्यांचे नाव दिल्लीतून फायनल केले. बर्वे अडचणीच्या ठरतील हे दिसत असल्याने त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला. ते योग्य ठरवून जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले. मात्र केदारांनी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना मैदानात उतरवले. आपले जात प्रमाणपत्र भाजपच्या सांगण्यावर रद्द केले हे सांगून रश्मी बर्वे प्रचारात सहानुभूती देखील मिळवली. मतदारांना भावनिक आवाहन केले.

Bawankule and Kedar
Nagpur, Ramtek Exit Poll : गडकरी नागपूरचा गड राखणार? 'रामटेक'मध्ये काय होणार?

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी आधीच काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना रामटेकच्या उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यांना कुठल्याही परिस्थिती तुमाने यांना उमेदवारी द्यायची नव्हती. सर्वेक्षणाचे कागदी घोडे पुढे केले.

तुमाने यांना उमेदवारी दिल्यास पराभव निश्चित असल्याचे दर्शवून राजू पावरे यांना उमेदवारी देण्यास शिंदे सेनेला भाग पाडले. हे करून बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचीसुद्धा नाराजी ओढावून घेतली. त्याचा अपेक्षित परिणाम मतमोजणीत दिसून येते आहे. तिसऱ्या फेरीत श्यामकुमार बर्वे सुमारे १५ हजार मतांची आघाडी घेऊन समोर आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com