Nagpur, Ramtek Exit Poll : गडकरी नागपूरचा गड राखणार? 'रामटेक'मध्ये काय होणार?

Nitin Gadkari Vs Vikas Thackeray : नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे असा थेट सामना रंगला. यावेळी मतविभाजन करणाऱ्या रिपाई, वंचित बहुजन आघाडी, एमआयएमने नागपूरमध्ये उमेदवार उभा केला नव्हता.
Nitin Gadkari
Nitin Gadkarisarkarnama

राजेश चरपे

अयोध्येत राम मंदिराची उभारणी करून रामभक्तांना खुश केल्यानंतरही रामटेक लोकसभा मतदासंघात मात्र महायुतीला फारसा लाभ होताना दिसत नाही. राज्यतील ४७ जागांचे भाकित वर्तवणाऱ्या विविध संस्थांना अद्यापही रामटेकचा अंदाज वर्तवता आलेला नाही. दुसरीकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी नागपूरचा गड पुन्हा सर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे असा थेट सामना रंगला. यावेळी मतविभाजन करणाऱ्या रिपाई, वंचित बहुजन आघाडी, एमआयएमने नागपूरमध्ये उमेदवार उभा केला नव्हता. बसपाने तुलनेत एकदमच कमजोर उमेदवार दिला होता. त्यामुळे गडकरी यांच्या मताधिक्क्यांवर मोठा परिणाम होईल असे अंदाज वर्तविले जात होते. महाविकास आघाडी आणि नेत्यांच्या एकजुटीमुळे काँग्रेसला मोठा फायदा होईल असेही दावे केले जात आहे. असे असताना एक्झिट पोलने मात्र गडकरी यांनाच आघाडी दर्शवली आहे.

मागील निवडणुकीत विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघापैकी नऊ जागा जिंकणाऱ्या भाजप-सेना युतीला यावेळी मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज विविध संस्थांच्या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. हे बघता विदर्भातून कोणाची एक्झिट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2019 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा अपवात वगळता विदर्भातील नऊ जागा युतीने जिंकल्या होत्या. यावेळी चंद्रपूर जिंकण्यासाठी भाजपने मोठी खेळी केली. माजी खासदार आणि केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांना डावलून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवण्यात आले होते.

संसदेत जाण्याची आपली इच्छा नसल्याचे मुनगंटीवार सुरुवातीपासूनच सांगत होते. आपले तिकीट कापले जावे असे ईश्वराला प्रार्थना केल्याचेही त्यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी उघडपणे माध्यमांना सांगितले होते. त्यानंतरही पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिला. विशेष म्हणजे या मतदारसंघातून खासदार दिवगंत. बाळू धानोरकर यांच्या पत्नीला काँग्रेसने मैदानात उतरवून काँग्रेसने आधीच बाजी मारली होती. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा धानोरकर यांच्या उमेदवारीस कडाडून विरोध केला होता. शिवाणी वडेट्टीवार यांनी या जागेवर दावा केला होता.

Nitin Gadkari
Sharad Pawar Vs Ajit Pawar : घड्याळाची टिकटिक बंद पाडण्यासाठी शरद पवारांनी तेल ओतलेली मशाल पेटणार?

काँग्रेसमधील आपसातील मतभेद बघता मुनगंटीवर विजयी होतील असे सर्वांना सुरुवातीला वाटत होते. मात्र मुकाबला कडवा झाला. महाविकास आघाडीचा प्रयोग आणि ओबीसी समाजाच्या एकजुटीने चंद्रपूर भाजपसाठी धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. आज आलेल्या ‘एक्झिट पोल'च्या अंदाजांमध्ये चंद्रपूरमध्ये भाजपला पराभूत दाखवत आहे.

शिंदे सेनेला रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलवणे महागात पडणार असल्याचे एक्झिट पोल दाखवत आहे. येथून सलग दोन वेळा निवडून आलेले खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापण्यात आले. भाजपने यासाठी आग्रह धरला होता. त्यांच्या ऐवजी काँग्रेसच्या आमदार राजू पारवे यांना आयात करण्यात आले होते. मात्र याचा फायदा महायुतीला झाल्याचे मतदानातून दिसले नाही. पारवे यांच्यापेक्षा तुमाने बरे होते असे महायुतीच्याच समर्थक व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

यवतमाळमध्ये सुद्धा खासदार भावना गवळी यांना डावलण्यात आल्याने नाराजीचा फटका महायुतीला बसताना दिसतो. वर्धा, गोंदिया-भंडारा, गडचिरोली, अकोला मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. भाजपसाठी गडचिरोली धोक्यात असल्याचे मतदानोत्तर चाचण्यातून दर्शवले जात आहे. अमरावतीत नवनित राणा यांना उमेदवारी देण्याचा प्रयोग यशस्वी होईल असे एक्झिट पोलचे भाकीत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Nitin Gadkari
Kolhapur, Hatkanangle Exit Poll : कोल्हापुरात 'महाराज'; हातकणंगलेत सरूडकरांची 'पाटीलकी'?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com