Ramtek Lok Sabha Constituency : चंद्रशेखर बावनकुळे की सुनील केदार, कोण ठरणार रामटेकचे किंगमेकर?

Chandrashakher Bawankule vs Sunil Kedar : बावनकुळे आणि सुनील केदार यांनी घेतलीये उमेदवारांना निवडून आणण्याची हमी
Sunil Kedar, Nana Patole and Chandrashekhar Bawankule.
Sunil Kedar, Nana Patole and Chandrashekhar Bawankule. Sarkarnama

राजेश चरपे

Ramtek News : रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशखेर बावनकुळे आणि काँग्रेसने माजी मंत्री सुनील केदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बावनकुळे यांच्या पसंतीने शिंदेच्या शिवसेनेने तर काँग्रेसने सुनील केदार यांच्या इच्छेनुसार लोकसभेचा उमेदवार दिला. या नेत्यांनी उमेदवारांना निवडून आणण्याची हमी घेतली असल्याने रामटेकचा गड कोण सर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप-सेना युतीत रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. उद्धव सेनेतून कृपाल तुमाने येथून दोन वेळा निवडूण आले होते. हा मतदारसंघ स्वतःकडे घेण्यासाठी भाजपचे अनेक प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली. मात्र शेवटपर्यंत ही जागा सोडण्यास शिंदे सेनेने नकार दिला. तत्पूर्वी भाजपने उमरेडमधील काँग्रेसचे आमदार यांना शब्द दिला होता. ते वेटिंगवर होते. शेवटी शिंदे सेनेत प्रवेश घेऊन ते रामटेकचे उमेदवार झाले. त्यांना निवडूण आणण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतली आहे.

रामटेकमध्ये केदार यांशिवाय उमेदवार निवडून आणणे अवघड असल्याने काँग्रेसने रिस्क घेतली नाही. सर्वाधिकार केदार यांना दिले होते. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना उमेवादवारी दिली. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांच्याऐवजी केदारांनी श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली. 

बारेच्यांना संधी दिली जात असल्याने भाजपच्या एका माजी जिल्हा परिषद सदस्याने बंडखोरी केली. शंकर चहांदे यांना वंचित बहूजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला. दुसरीकडे केदारांनी उमेदवारीला विरोध केल्याने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी बंड केले. वंचितने शंकर चहांदे यांचा पाठिंबा काढून गजभिये यांना दिला. असे असले तरी येथे भाजप विरुद्ध काँग्रेस असचा सामना रंगला. त्यामुळे बावनकुळे आणि केदार यांच्या वर्चस्वासाठी रामटेकचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सावनेर विधानसभा मतदारसंघातून सुनील केदार सलग चार वेळा निवडूण आले आहेत. त्यांना पराभूत करण्याचे आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले. भाजपने विविध प्रयोग केले. मात्र कोणालाही यश आले नाही. अलीकडे नागपूर जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक घोट्याळ्यात न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांची आमदारकी रद्द झाली आहे. याच लोकसभा मतदारसंघातील कोराडी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे तीनवेळा निवडूण आले आहेत.

Sunil Kedar, Nana Patole and Chandrashekhar Bawankule.
Devendra Fadnavis : लोकसभेची 'एक्झाम' फडणवीसांना 'डिस्टिंक्शन' मिळणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com