Ramtek Lok Sabha Elecion : राजू पारवे विरुद्ध श्‍यामकुमार बर्वे नव्हे, तर भाजप विरुद्ध सुनील केदार !

Sunil Kedar : या मतदारसंघात माजी मंत्री सुनील केदार यांचे चांगलेच वर्चस्व आहे. त्यांना डावलून उमेदवारी दिल्यास उमेदवार हमखास पराभूत होतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
Raju Parve, Sunil Kedar and Shyamkumar Barve
Raju Parve, Sunil Kedar and Shyamkumar BarveSarkarnama
Published on
Updated on

Ramtek Lok Sabha Elecion : सुनील केदार हे नागपूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे नाव. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रकरणानंतर आता त्यांना आगामी निवडणूक लढता येणार नाही आणि रामटेकमध्ये जर त्यांचा उमेदवार पराभूत झाला, तर त्यांचे राजकीय वर्चस्व कमी होईल, यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. डॅशिंग सुनील केदारांच्या विरोधात भाजप नेत्यांना काँग्रेसच्याही काही नेत्यांची छुपी साथ आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा प्रमुख उमेदवारच बाद झाल्याने अर्धी लढाई महायुतीचे उमेदवार, आमदार राजू पारवे यांनी जिंकली आहे. हा सर्व खटाटोप भाजपने केल्याचा आरोप करून काँग्रेसच्या वतीने मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी येथील खरी लढत केदार विरुद्ध भाजप अशी झाली आहे.

रामटेकच्या मतदारांनी काँग्रेस आणि शिवसेना दोघांनाही साथ दिली आहे. भाजप-सेना युती असताना शिवसेनेचे सुबोध मोहिते, प्रकाश जाधव, कृपाल तुमाने येथून निवडून आले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव यांनासुद्धा रामटेकने दिल्लीत पाठवले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना संधी देणाऱ्या या मतदारसंघात नेहमीच चुरशीचा सामना बघायला मिळाला. या मतदारसंघात माजी मंत्री सुनील केदार यांचे चांगलेच वर्चस्व आहे. त्यांना डावलून उमेदवारी दिल्यास उमेदवार हमखास पराभूत होतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raju Parve, Sunil Kedar and Shyamkumar Barve
Ramtek Lok Sabha Election : कुरघोडीत महायुतीची काँग्रेसवर मात, सुनील केदार काय करणार, याकडे लक्ष !

या वेळी काँग्रेसच्या कोणत्याच बड्या नेत्याने उमेदवारी देताना येथे हस्तक्षेप केला नाही. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांनाच उमेदवारी द्यावी, असा हट्ट केदारांनी धरला होता. तो पुरवण्यातसुद्धा आला. रश्‍मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रावर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच आक्षेप घेण्यात आला होता. समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी समितीने त्यांना नोटीससुद्धा पाठवली होती. डोक्यावर टांगती तलवार असतानाही केदारांनी त्यांना उमेदवारी दिली. अर्ज छाननीच्या दिवशीच त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने त्यांच्याऐवजी श्यामकुमार बर्वे यांना काँग्रेसने घोड्यावर बसवले.

महायुतीत भाजपने हा मतदारसंघ मागितला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाम नकार दिला. तत्पूर्वी, भाजपने काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना उमेदवारीचा शब्द दिला होता. शेवटी तडजोड करण्यात आली. पारवे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. याकरिता शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा बळी देण्यात आला.

रामटेकमध्ये सहापैकी दोन भाजप आणि शिवसेनेचा येथे आमदार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सुनील केदार याच मतदारसंघातील आहेत. राजू पारवे यांना आयात करून भाजपने आणखी एक मतदारसंघ काबीज केला आहे. जिल्हा परिषद काँग्रेसकडे असली तरी ग्रामपंचायतीत भाजपने चांगलीच घुसखोरी केली आहे. हे बघता सामना तुल्यबळ दिसत असला तरी आमदार आणि नेत्यांचा येथे कस लागणार आहे.

केदारांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपमधील आणि काँग्रेसमधील त्यांचे पक्षांतर्गत शत्रू एकत्रित झाले आहेत. याकरिता केदारांचे उजवा हात समजले जाणारे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांना भाजपने गळाला लावले आहे. केदारांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू असले तरी ते लढवय्ये असल्याने त्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्याची कोणाची हिंमत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.

Raju Parve, Sunil Kedar and Shyamkumar Barve
Ramtek Lok Sabha Constituency : पराभवाच्या भीतीने भाजपने रश्‍मी बर्वे यांचा ‘पत्ता काटला’ !

दलित विरुद्ध हिंदू दलित वाद...

शिवसेनेने उमेदवार देताना हिंदू दलिताला नेहमीच प्राधान्य दिले. यास प्रत्युत्तर देण्यासाठी या वेळी काँग्रेसने हिंदू दलित कार्ड खेळले आहे. त्यामुळे बौद्ध समाज नाराज आहे. धर्मनिरपेक्ष काँग्रेसकडूनही अपेक्षा नव्हती, असे आता येथील दलित बांधव बोलायला लागले आहेत. यावरून हिंदू दलित विरुद्ध बौद्ध दलित, असा सुप्त वाद येथे निर्माण होऊ लागला आहे.

नेत्यांभोवतीच निवडणूक...

रामटेकच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा चर्चेत नाही. त्यापेक्षा भाजप विरुद्ध सुनील केदार असाच सामान येथे बघायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीने भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनीही वंचितची उमेदवारी मागितली होती. ते रिंगणात राहिल्यास काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गजभिये यांचाही केदारांच्या विरोधकांमध्ये समावेश आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असतानाही केदारांनी त्यांना उघडपणे विरोध दर्शवला होता.

Edited By : Atul Mehere

R

Raju Parve, Sunil Kedar and Shyamkumar Barve
Ramtek Lok Sabha Election : कुंभारेंच्या माध्यमातून भाजपने साधला सुनील केदारांवर नेम !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com