Ramtek Lok Sabha Constituency : पराभवाच्या भीतीने भाजपने रश्‍मी बर्वे यांचा ‘पत्ता काटला’ !

Nana Patole : राष्ट्रवादी ही काँग्रेसची पैदास होती आणि ती वाईट होती. ती आता निघून गेलेली आहे. त्याच्यातच आम्ही समाधानी आहोत.
Rashmi Barve and Nana Patole
Rashmi Barve and Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Ramtek Lok Sabha Constituency :पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही सुरू आहे. त्यावरून विरोधक भाजपवर चांगलेच तोंडसुख घेत आहेत. जात पडताळणी समितीने काँग्रेसच्या उमेदवार, नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्‍मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. यामध्ये भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. यावरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले.

गोंदिया येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाने दुसऱ्या उमेदवाराचा बॅकअप फॉर्म भरलेला होता. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. परंतु सरकारी यंत्रणांचा गैरवापर भाजपने निवडणुकीच्या काळातही थांबवलेला नाही. कारण भाजप पक्ष घाबरलेला पक्ष आहे आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपला पराभव होईल, या भीतीने अशा प्रकारची कामे भाजप नेते करीत आहेत. रामटेकमध्ये लढण्यासाठी उमेदवार आणला, तोसुद्धा दुसऱ्या पक्षाचा. एवढ्यावरही समाधान झाले नाही, तर आमच्या उमेदवाराचा अर्ज यंत्रणेच्या माध्यमातून अवैध ठरवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rashmi Barve and Nana Patole
Nana Patole At Pratapgad : प्रतापगडावर काय घडले? डॉ. पडोळेंच्या खांद्यावर नानांचा 'हात'?

35 वर्षांपासून भाजप आणि राष्ट्रवादीची लढाई होती. आता तिकडे राहिली ती आपली पैदास आहे, असे म्हणत कुणाचेही नावं न घेता महाविकास आघाडीला प्रफुल पटेल यांनी टोला लगावला होता. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी ही काँग्रेसची पैदास होती आणि ती वाईट होती. ती आता निघून गेलेली आहे. त्याच्यातच आम्ही समाधानी आहोत, असा प्रतिटोला नाना पटोलेंनी प्रफुल पटेल यांना लगावला.

केंद्र सरकार घाबरले आहे. म्हणून लहान-लहान पक्षांना जवळ घेत आहे. अब की बार 400 पार चा नारा भाजप देत आहे. यामध्ये अमरावतीची नवनीत राणांचीही एक जागा आहे. याबाबत विचारले असता, नाना पटोले म्हणाले, की सध्याची केंद्र सरकार 420 सरकार आहे आणि या 420 सरकारला बहुमत प्राप्त होत नसल्यामुळे अनेक पक्षांचे नेते फोडून आयात करण्याचा प्रसंग या भाजपवर आला आहे. आमचा पक्ष सर्वात मोठा आहे, असे दाखवणाऱ्या पक्षाला आज इतर पक्षांची मदत घ्यावी लागते. यावरूनच स्पष्ट होत आहे की, केंद्र सरकारच्या विरोधात जनमानसाचा रोष आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Edited By : Atul Mehere

R

Rashmi Barve and Nana Patole
Nana Patole : अरेरे..! काल आंबेडकरांनी हाकलले, आज नानांनी दाखवला बाहेरचा रस्ता !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com