Rashmi Barve News: जातप्रमाणपत्र प्रकरण; नवनीत राणांना दिलासा, पण रश्मी बर्वेंची उमेदवारीच रद्द

Ramtek Lok Sabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जातप्रमाणपत्राचा वाद सुरू आहे. त्यांच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे.
Rashmi Barve
Rashmi Barvesarkarnama

Ramtek Lok Sabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या (Congress) उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांच्या जातप्रमाणपत्राचा वाद सुरू आहे. त्यांच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र, आता रश्मी बर्वे यांच्या जातप्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र रद्द प्रकरणाला नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे बर्वे यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, बर्वे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून दाखल केलेला अर्ज फेटाळल्या प्रकरणी कुठलाही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

तर दुसरीकडे  मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जातप्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचं जातप्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. त्यामुळे बर्वेंना धक्का, तर राणांना दिलासा मिळाला आहे.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकरणी नागपूर खंडपीठात (Nagpur Bench) पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार असल्याचं सांगितलं आहे. परंतु, तोपर्यंत रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीचं मतदान पार पडणार आहे. त्यामुळे बर्वे यांना जात व जातवैधता प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी दिलासा मिळाला असला तरी त्यांची उमेदवारी रद्द केल्याप्रकरणी दिलासा मिळाला नाही.

Rashmi Barve
Uday Samant News : रश्मी बर्वे यांचा अपमान काँग्रेसनेच केला, असे उद्योगमंत्री सामंत का म्हणाले..!

राज्यात पाच टप्प्यांत मतदान होत असून, पहिल्या टप्प्यात रामटेक लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे. म्हणजे येत्या 19 एप्रिलला येथे मतदान होईल, तर बर्वेंचा अर्ज खारिज केल्याच्या प्रकरणाबाबतची पुढील सुनावणी 22 एप्रिलला होणार आहे.

Rashmi Barve
Mohite Patil Meet Pawar : मोहिते पाटील गुढी पाडव्याला ‘शिवरत्न’वर बांधणार राष्ट्रवादीचे तोरण!; पवारांसोबत ‘सिल्व्हर ओक’वर खलबतं

हे काँग्रेसचेच षडयंत्र

रामटेक मतदारसंघातून काँग्रेसकडून (Congress) रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. परंतु यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. बर्वे यांना काँग्रेसला उमेदवारीच द्यायची नव्हती. म्हणून आधीच दोन अर्ज भरण्यात आले होते. श्यामकुमार बर्वे यांच्या अर्जासोबत बी फॉर्मसुद्धा जोडण्यात आला होता. आता भाजपनेच हे घडवले असे सांगून मतदारांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जात आहे. हे काँग्रेसचेच हे षडयंत्र होते, असा आरोप सामंत यांनी केला आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com