Mohite Patil Meet Pawar : मोहिते पाटील गुढीपाडव्याला ‘शिवरत्न’वर बांधणार राष्ट्रवादीचे तोरण!; पवारांसोबत ‘सिल्व्हर ओक’वर खलबतं

Madha Lok Sabha Constituency : येत्या मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी धैर्यशील हे तुतारी फुंकणार असल्याची माहिती आहे. आता धैर्यशील यांच्यासमवेत मोहिते पाटील कुटुंबातील आणखी कोणकोण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीत प्रवेश करणार, याची उत्सुकता आहे.
Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Dhairyasheel Mohite Patil-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 4 April : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून माढा मतदारसंघ मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. भाजपने माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट देताच धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले. गेली काही दिवस ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. त्यादृष्टीने बुधवारी एक पाऊल पुढे पडले. धैर्यशील मोहिते पाटील यांनी ‘सिल्व्हर ओक’वर पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. येत्या मंगळवारी (ता. 09 एप्रिल) गुढीपाडव्याच्या दिवशी मोहिते पाटील राष्ट्रवादीचे तोरण ‘शिवरत्न’वर बांधणार असल्याची माहिती आहे.

माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी बुधवारी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची गुप्तपणे भेट घेतली. या भेटीचा सुगावाही प्रसारमाध्यमांना लागू दिला नव्हता. मोहिते पाटील आणि पवार यांच्यामध्ये ‘सिल्व्हर ओक’वर सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. येत्या मंगळवारी गुढी पाडव्याच्या दिवशी धैर्यशील हे तुतारी फुंकणार असल्याची माहिती आहे. आता धैर्यशील यांच्यासमवेत मोहिते पाटील कुटुंबातील आणखी कोणकोण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीत प्रवेश करणार, याची उत्सुकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Hemant Patil News: तिकीट कापल्यानंतर हेमंत पाटील मुख्यमंत्र्यांवर नाराज; आज घेणार मोठा निर्णय

भाजपने निंबाळकर यांना तिकीट जाहीर केल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाचा (Madha Lok Sabha Constituency ) दौरा केला आहे. धैर्यशील यांच्यासोबत मोहिते पाटील कुटुंबीयही मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत आहे. सुरुवातीला त्यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. मतदारसंघातील कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता आणि मतदारांचा कानाेसा घेतला. त्यावेळी समर्थकांकडून त्यांच्यावर शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, असा दबाव आला.

‘शिवरत्न’वर मतदारसंघातील बड्या नेत्यांची डिनर डिप्लोमसीही झाली. समजूत काढण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनही आले होते. मात्र, त्याच दिवशी मोहिते पाटील कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य जयसिंह मोहिते पाटील हे भाजपला धडा शिकवण्याची भाषा करत होते. शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविण्याचे आमचं ठरलं आहे, असेही स्पष्ट करत होते. मात्र, चर्चा पुढे सरकत नव्हती. त्यावेळी पवारांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मोहिते पाटलांनी सिल्व्हर ओक गाठले आणि राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

R

Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Lok Sabha Election: रामटेकपाठोपाठ वंचितने आणखी एका मतदारसंघातील उमेदवार बदलला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com