Ramtek Loksabha: शिंदे सेनेचे निरीक्षक रामटेकमध्ये, लोकसभेसाठी चाचपणी..

Shivsena News : रामटेक लोकसभा मतदारसंघ शिंदे सेनेचे खासदार कृपाल तुमाने यांचा आहे.
Krupal Tumane News
Krupal Tumane News Sarkarnama

Nagpur Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे निरीक्षका रामटेकमध्ये दाखल झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी ते आले आहेत. त्यांनी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यांचे मतही जाणून घेतले.

Krupal Tumane News
Dhananjay Munde : ड्रोनद्वारे शेतीकामे करण्यासाठी कृषिमंत्री मुंडे आग्रही..

रामटेक (Ramtek) लोकसभा शिवसेना निरीक्षक जेरी डेव्हिड, सिद्धेश ओवलेकर, जयंत साठे यांनी जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रामटेक लोकसभा, नागपूर ग्रामीण (Shivsena) शिवसेना, युवासेना, महिला आघाडीसह प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांच्या संघटनात्मक बैठका घेतल्या.

रामटेक लोकसभा मतदारसंघ शिंदे सेनेचे खासदार कृपाल तुमाने (vidharbh) यांचा आहे. पूर्व विदर्भातील शिंदे सेनेसोबत असलेले ते एकमेवर खासदार आहेत. उमरेड, कामठी, रामटेक, काटोल, सावनेर, हिंगणा विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांसोत त्यांनी चर्चा केली.

बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ग्रामीण शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी,महिलांना न्याय देणाऱ्या योजनांचा पाठपुरावा व लाभार्थ्यांपर्यंत मदत पोचवण्यासाठी घरोघरी जाण्याचे सर्वांना आवाहन केले.आयुष्यमान भारत कार्ड, पीक योजना, महिला बचत गटासाठी अधिक भांडवल, एक लाखा पर्यंतची आर्थिक मदत, शेतकऱ्यांसाठी ग्रामीण घरकुल योजना, शेततळे, पशुपालन, कृषी अवजारे, सिंचनासाठीच्या योजना.

तसेच ग्रामीण पतपुरवठा योजनांचे सबलीकरण, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या सोयी, शिष्यवृत्ती या सर्व योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना शिवदूत व शाखाप्रमुख यांच्यामार्फत राबविण्यास सांगितले. या योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, या दृष्टिकोनातून रामटेक लोकसभेतील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शिवसेनेमार्फत प्रचार प्रसार करण्याच्याय सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com