Rane And Mitkari : अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी या दोघांमधील एका संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे. अकोल्यातील एका गुन्हेगारावर गुन्हा दाखल न करण्यासाठी आमदार मिटकरी यांनी पोलिस अधीक्षकांकडे मागणी केल्याचे संभाषण या क्लिपमध्ये आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मिटकरींचा पगार काढला आहे.
आमदार नितेश राणे यांनी पोलिसांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर दबाव वाढत असल्याचा आरोप होत असतानाच आता आमदार मिटकरींची कथित 'ऑडिओ क्लिप' समोर आली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांच्या बाबतीत वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. राणे यांनी 'पोलिस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलिस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी केले होते.
विरोधकांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले. पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आता पुन्हा सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार अमोल मिटकरी अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यावर एकप्रकारे दबाव टाकत असल्याचं एका कथित ऑडिओ क्लिपवरून समोर आलं आहे. त्यानंतर आमदार आव्हाड यांनी मिटकरींना चांगलेच धारेवर धरले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार नितेश राणे यांनी पोलिसांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर दबाव वाढत असल्याचा आरोप होत असतानाच आता आमदार मिटकरींची कथित 'ऑडिओ क्लिप' समोर आली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांच्या बाबतीत वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. राणे यांनी 'पोलिस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलिस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी केले होते.
विरोधकांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले. पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आता पुन्हा सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार अमोल मिटकरी अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यावर एकप्रकारे दबाव टाकत असल्याचं एका कथित ऑडिओ क्लिपवरून समोर आलं आहे.
अकोल्यातील एका सराईत गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा हा प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मिटकरी पोलिस अधीक्षकांना म्हणाले की, सतीश वानखेडे याच्यावर गुन्हा दाखल केल्यास थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना बोलेन. त्यामुळे सतीश वानखेडेवर गुन्हे दाखल न करण्याची मागणी आमदार मिटकरींनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
कोण आहे सतीश वानखेडे?
सतीश वानखेडे हा अकोल्यातील कृषीनगर परिसरातील पंचशीलनगर भागातला एक सराईत गुन्हेगार आहे. अकोल्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये वानखेडेवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहेत. 2015 मध्ये वानखेडेवर अकोला पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेली आहे. सोबतच नगरसेवक अजय रामटेके प्रकरणातील आरोपी धनंजय बिल्लेवारवर वानखेडेने जीवघेणा हल्ला करत या हल्ल्यात त्यांच्या हाताची बोटे कापली होती. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले होते. मात्र, असे असताना पोलिसांनी वानखेडेंवर केलेल्या कारवाईच्या विरोधात अमोल मिटकरींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मिटकरी म्हणाले मी सत्ताधारी आमदार...
ऑडिओ क्लिपमधील संवादानुसार जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोलताना मिटकरी म्हणाले, आपण कायम माझ्याशी मोठ्याने बोलता. मी सत्ताधारी आमदार आहे. याबाबत मी येत्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहे. जर एखादा गुन्हेगार सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला संधी दिली पाहिजे. सदर गुन्हेगार हा माझ्या पक्षाशी संबंधित नाही, अन् तो माझा कार्यकर्ताही नाही. याबाबत मी तुमच्याशी इथून पुढे बोलणार नाही, बोलायचे असल्यास मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असेदेखील अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.