Ranjeet Patil| Amravati Graduate Election
Ranjeet Patil| Amravati Graduate ElectionSarkarnama

Amravati Graduate Election: भाजपच्या मतदारांनीच केला रणजीत पाटलांचा पराभव; अजित दादांचा दावा किती खरा?

अमरावती जिल्ह्याकडे केलेले दुर्लक्ष हेदेखील रणजीत पाटील यांच्या पराभवाचे एक कारण मानले जात आहे.

Amravati Graduate Election: अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत धीरज लिंगाडे यांचा दणदणीत विजय झाला. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव झाला.

भाजपचे रणजित पाटील यांना 41हजार 005 मते मिळाली तर काँग्रेसचे धिरज लिंगाडे यांना 43 हजार 383 मते मिळाली आहेत. पण यामध्ये आठ हजार 551 मते अवैध ठरली. या अवैध मतांची पुन्हा एकदा तपासणी करण्याची मागणी रणजित पाटील यांच्या प्रतिनिधींना केली आहे.

Ranjeet Patil| Amravati Graduate Election
Amravati : अमरावतीत नवा ट्विस्ट : तब्बल 8735 अवैध मतांची फेरमोजणी : भाजपची मागणी!

या बाद मतांबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निकालावर भाष्य केलं आहे. ''मी अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निकालाची माहिती घेत होतो. यात कोणालाच एक नंबरची मतं मिळाली नाहीत. यात एक दोन तीन चार अशी मतं द्यायची असतात. दुसऱ्या नंबरला डॉ. रणजीत पाटील यांना मतं देण्यात आली. तशी चार हजार मतं निघाली. ती चार हजार मतं बीजेपी मांइंडेड असताना त्यांनी एक नंबरचं न देता दोन नंबरला मतं दिली. आता ही दुसऱ्या पसंतीची मतं का दिली गेली.

डॉ. रणजीत पाटील तसे सज्जन पुरुष. पण विभागातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अमरावती आणि या जिल्ह्याकडे त्यांनी सातत्याने दुर्लक्ष केले. त्यांच्या पराभवामागील हे एक मोठे कारण आहे. वरून दिसत नसली तरी भाजपमध्ये गटबाजी आहे. रणजीत पाटलांचे भाजपमधील एका मोठ्या गटासोबत (अकोला) पटत नाही. या गटाचे नेते भाजपमधील मोठे प्रस्थ आहे. त्या गटासोबत जुळवून न घेणे, याचा फटका त्यांना बसला. पाटलांचा विरोधी गट केवळ तटस्थ राहिला असे नाही, तर त्या गटाने पाटलांच्या विरोधात काम केले. 

आपल्या वरिष्ठांना त्यांना काहीतरी सुचवायचं असेल, ते सर्व पदवीधर होते. त्यांनी पहिल्या पसंतीची मतं रणजीत पाटलांना का दिली नाही, दोन नंबरची मतं दिली. त्यामुळेचं ती मतं बाद झाली. सकाळी तिथली आठ हजार मतं बाद होती. मी म्हटलं एवढी कशी, ते म्हणाले, दोन नंबरची चार हजार मतं होती. एक नंबरचं मत नसल्यावर ते मत बाद होतं. म्हणजेच, भाजपच्या लोकांनाचं रणजीत पाटलांचे नेतृत्व नको होते.'' असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com