Sharad Pawar : सदाभाऊंना मोठा धक्का! पक्षातील बड्या नेत्यानं 'तुतारी' घेतली हाती

Bhanudas Shinde Join Ncp Sharad Pawar : रयत क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शरद पवारसाहेबांच्या यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे.
bhanudas shinde join ncp.jpg
bhanudas shinde join ncp.jpgsarkarnama
Published on
Updated on

रयत क्रांती पक्षाचे नेते, आमदार सदाभाऊ खोत हे नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र वार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब यांच्यावर टीका करताना दिसतात. यातच आता शरद पवारसाहेबांनी सदाभाऊ खोत यांना जोरदार धक्का दिला आहे. खोत यांच्या रयत क्रांती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीच राष्ट्रवादीत ( शरदचंद्र पवार ) प्रवेश केला आहे.

पुण्यातील मोदी बाग येथील कार्यालयात रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवारसाहेबांच्या ( Sharad Pawar ) उपस्थितीत राष्ट्रवादीत ( शरदचंद्र पवार ) प्रवेश केला आहे. थेट प्रदेशाध्यक्षांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं सदाभाऊ खोत यांना हा धक्का मानला जात आहे.

गेली 25 वर्षे भानुदास शिंदे शेतकरी चळवळीत काम करत आहेत. 1999 पासून त्यांनी शेतकरी चळवळीत काम करण्यास सुरूवात केली. शेतकरी चळवळीतील नेते, स्वर्गीय शरद जोशी ते शरद पवारसाहेब, असा भानुदास शिंदे यांचा राजकीय प्रवास आहे.

bhanudas shinde join ncp.jpg
Babandada Shinde : अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंनी मुलासह घेतली शरद पवारांची भेट; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

शाखा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष राज्य प्रवक्ता ते रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, अशा पदांवर शिंदेंनी शेतकरी चळवळीत काम केलं. वेगवेगळी शेतकरी आंदोलनं, ऊस आंदोलन, कर्जमुक्ती आंदोलनांमध्ये शिंदेंनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. तसेच, ऊसदार नियंत्रण मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

bhanudas shinde join ncp.jpg
Nanded Politics : शेकापच्या आशा शिंदे शरद पवारांना भेटल्या, चिखलीकरांची विधानसभेची वाटही बिकट ?

"शेतकरी चळवळीत असताना शेतकऱ्यांसाठी काम केलं. आता यापुढे शरद पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठीच काम केले जाईल. राज्यात शेतकरी हिताची कामे केली जातील," असा विश्वास भानुदास शिंदेंनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com