Ravi Rana : किशोरी पेडणेकर यांनी किती खोके 'मातोश्री'ला पोहचविले? राणांचा गंभीर आरोप!

Ravi Rana : "खोक्यांची प्रथाउद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीच सुरू केलेला आहे."
MLA Ravi Rana
MLA Ravi RanaSarkarnama

अमरावती : आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात काही दिवसांपासून आरोप - प्रत्यारोप होत आहे. यामध्ये आता थेट मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने त्यांच्यातील वाद काही प्रमाणात निवळल्याचे दिसतआहे. मात्र याच मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे -फडणवीस सरकारवर टीकी केली होती. खोक्यांवरून खोके सरकारमधील दोन आमदार भांडतायेत, असे ठाकरे यांनी म्हंटले होते. यावर आता रवी राणांनी ठाकरेंना प्रत्युत्तर देताना गंभीर आरोप केला आहे.

MLA Ravi Rana
Bachchu Kadu : 'मी 'खोके' घेतले का? शिंदे-फडणविसांनीच स्पष्ट करावे!'

रवी राणा म्हणाले, मी माझ्या सिद्धांताची लढाई लढतो. जनतेत काम करतो. माझा कोणाशीही कसला वाद नाहीये. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीच मातोश्रीवर बसून मुंबई महानगरपालिकेतल्या “खोक्याचं”राजकारण सुरू केलं. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर या महापौर होत्या. तेव्हा त्यांनी किती खोके मातोश्रीवर पोहोचवल्या. हे सगळ्यांना माहिती आहे.

मुंबईत खोके घेतल्याशिवाय उद्धव ठाकरे यांचा पत्ताही हलत नव्हता. खोक्याची ही प्रथा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीच सुरू केलेला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.

MLA Ravi Rana
Bhaubij 2022 Special : भारतीय राजकारणातील प्रसिद्ध भाऊ-बहिणींची जोडी!

यावेळी राणा म्हणाले की, माझे नेते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना न्याय दिला. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले आहेत. एकट्या अमरावती जिल्ह्यातच ५५४ कोटी रुपये दिले गेले. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी चांगली गेला आहे. आम्हाला विशेष अभिमान वाटतो की, विदर्भाचा एक चांगला नेता, राज्याच्या राजकारणात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com