Ravikant Tpukar VS Raju Shetti : रविकांत तुपकरांनी नाकारले राजू शेट्टींचे गुरुत्व, म्हणाले माझे गुरू...

Raju Shetti : राजू शेट्टी हे प्रत्येक पंचवार्षिकमध्ये स्वतःपुरता पाठिंबा मागायचा व आघाडी करायचे. जेव्हा निवडणूक व्हायची, तेव्हा आम्हासारख्यांना तयारी करूनसुद्धा थांबायला लावायचे.
Ravikant Tupkar and Raju Shetti
Ravikant Tupkar and Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Ravikant Tpukar VS Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी काम सुरू केले. पण नंतर नंतर त्यांच्यात वितुष्ट येत गेले. एवढे की नंतरच्या काळात तुपकर यांनी स्वाभिमानी हा शब्दही आपल्या नावापुढे लावणे बंद केले आहे, तर फक्त शेतकरी नेते एवढाच त्यांचा उल्लेख केला जातो. तुपकर हे शेट्टींचे शिष्य मानले जात होते, पण आता तुपकरांनी त्यांचे गुरुत्व नाकारले आहे.

राजू शेट्टी माझे गुरू नाहीत, शरद जोशी हेच माझे गुरू आहेत, असे काल (ता. 18) सायंकाळी तुपकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, राजू शेट्टी माझे गुरू नाहीत, शरद जोशी माझे खरे गुरू आहेत. मी कॉलेजमध्ये असताना त्यांच्यासोबत काम करीत होतो. जेव्हा राजू शेट्टी वेगळे झाले, तेव्हा शेट्टींसोबत काम करायला लागलो. त्यामुळे माझे गुरू हे शरद जोशीच आहेत.

दुसरं अस की राजू शेट्टी यांनी स्वतःपुरता महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला आहे. त्यांनी जे माध्यमांकडे सांगितले की, मला हातकणंगलेमध्ये पाठिंबा द्या, तिकडे राज्यात आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, असं स्पष्ट मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढविण्यासाठी आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवले व संघटना वाढविली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravikant Tupkar and Raju Shetti
Ravikant Tupkar : लोकप्रतिनिधी झोपेतच! शेतकर्‍यांचा मित्र भल्यापहाटे बांधावर

राजू शेट्टी हे प्रत्येक पंचवार्षिकमध्ये स्वतःपुरता पाठिंबा मागायचा व आघाडी करायची आणि आम्हाला तयारी करायला लावायची. पण जेव्हा निवडणूक व्हायची, तेव्हा आमच्या सारख्यांना तयारी करूनसुद्धा थांबायला लावायचे. हे नेहमीच होत आले आहे. त्यामुळे आता मात्र यावेळेस आम्ही बुलडाणा जिल्ह्यातून ही निवडणूक जनतेच्या आग्रहाखातर लढवणार आहोत. माझ्या निर्णयामुळे जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निवडणुकीत माझ्याशीच दिग्गजांची फाइट राहील व ही निवडणूकही जिंकणार, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी बोलून दाखविला.

आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी शेतकरी आणि बेरोजगार युवकांची वाट लावण्याचे काम केले आहे. त्यामुळे सर्वच अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत आपल्यासाठी सभागृहात लढणारा हक्काचा माणूस म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील लोक माझ्याकडे बघत आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता माझी एकट्याची राहिलेली नसून आता लोकांची निवडणूक झाली आहे. त्यामुळेच लोक स्वतः वर्गणी करूनही निवडणूक लढत आहेत, असेही तुपकर म्हणाले.

Edited By : Atul Mehere

R

Ravikant Tupkar and Raju Shetti
तुपकरांच्या मेळाव्याला सभागृह भरगच्च ; बघा काय म्हणाले रविकांत तुपकर ? | Ravikant Tupkar |

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com