Ravikant Tupkar : लोकप्रतिनिधी झोपेतच! शेतकर्‍यांचा मित्र भल्यापहाटे बांधावर

Buldhana News : पाच दिवस प्रतीक्षा अन्यथा पुन्हा एकदा करणार आंदोलन. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दौरा केल्यानंतर दिला इशारा
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Ravikant Tupkar : बुलढाणा जिल्ह्यात झालेली गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरयांच्या तोंडापर्यंत आलेला घास हिरावला गेला आहे. सगळ्या बाजूने संकटात शेतकरी सापडला आहे. जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, घरात बसून किंवा मंदिरात बसून पंचनामा करण्याची कार्यवाही करू नये. पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या चेलेचपाट्यांची नावे यादीत घालू नये. आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात शंभर टक्के नुकसान भरपाई पडेल, अशी व्यवस्था करा अन्यथा आम्ही आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शासनाला दिला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटांवर संकट येत आहेत. शेतातील माल विकून आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने उष:काल येईल, अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबात पुन्हा संकटाची काळरात्र आली आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात समाधान आणि आनंदाचा उष:काल होईल असे वाटत असतानाच दोन दिवसांपूर्वी पुन्हा बुलढाणा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याचा पाच एकर शेतातील गहू, हरभरा आणि कांदा पीक अक्षरश: आडवे झाले आहे. या पिकांच्या उत्पन्नावर शेतकऱ्याने पुढची आर्थिक गणिते मांडली होती. मात्र अवकाळी पावसाने त्याची सर्व स्वप्न अक्षरश: धुळीस मिळविले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar News : आंदोलनांच्या दणक्यामुळे मिळतेय शेतकऱ्यांना मदत !

सोमवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यासाठी प्रामुख्याने रब्बी पिकांसाठी प्रलयकारी ठरली. वादळी वारा, अवकाळी पावसासह गारपिटीने रब्बी पिके, भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले. तेराही तालुक्यांत सोमवारी रात्री उशिरा मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. यापाठोपाठ ठिकठिकाणी गारांचा वर्षाव झाला. बोराच्या आकारापासून मोठ्या आकाराच्या गारांच्या वर्षावाने पिके, भाजीपाला जमीनदोस्त झाला. सोंगलेल्या पिकांची अतोनात हानी झाली. मंगळवारीसुद्धा अनेक तालुक्यात पुन्हा गारपीट झाली. यामुळे 15 तासानंतर ही गारांचा खच शेतशिवारात कायम होता. शेतशिवारातील या गारा अद्याप विरघळलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्या उचलून पिकांमधून दुसऱ्या ठिकाणी न्यावी लागत आहे. अनेक ठिकाणी शेतातील गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास 40 ते 50 किलीची गार तयार झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.

जिल्ह्यावर आणि शेतकर्‍यांवर एवढे मोठे संकट कोसळले असताना बुलढाणा जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी आजपर्यंत शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचलेला नाही. मात्र शेतकर्‍यांसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे रविकांत तुपकर यांनी कशाचीही तमा न बाळगता दिवस उजेडताच शेगाव तालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतबांधावर धाव घेतली. त्यांना दिलासा दिला. तुपकरा दोन दिवसांपासून शेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पहुरपूर्णा शिवारात प्रत्यक्ष बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. शेतकर्‍यांना आधार दिला. उपजिल्हाधिकाऱ्यांना फोन वरून शेतकऱ्यांची स्थिती लक्षात आणून देऊन तलाठी व कृषी सहाय्यक यांनाही बांधावर घेवून जात तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. पहाटेच्या सुमारास तुपकरांना शेतबांधावर पाहुन अनेक शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : न्यायालयाच्या निकालापूर्वी कार्यकर्त्यांना दिला मोठा कानमंत्र, म्हणाले...

माध्यमांशी बोलतांना तुपकर म्हणले की, शेतकऱयांच्या हातातून सगळी रब्बीतील पिके गेली आहेत. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे. कांद्याचे नुकसान झाले. गव्हाचे नुकसान झाले. मकाही हातचा गेला. हरभरा झोपला.यावर्षी सोयाबीन, कापसाला भाव नाही. हवामान खराब झाल्यामुळे हरभऱ्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे सगळ्याच बाजूने संकटात शेतकरी आहे. आता तर गारपिटीने प्रचंड नासधूस केली आहे. जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यापूर्वीच ही कार्यवाही करण्याची मागणी तुपकर यांनी केली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar News : '...तर जेलमधून निवडणूक लढणार', रविकांत तुपकरांचे भवितव्य आज ठरणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com