Buldhana Politics : राजकारण तापले! तुपकर म्हणाले, कानाखाली आवाज काढण्याच्या पांचट धमकीकडे लक्ष देत नाही!

Ravikant Tupkar : खासदार प्रतापराव जाधव, संजय रायमुलकर यांना दिले प्रत्युत्तर
Ravikant Tupkar on Sanjay Raimulkar & Prataprao Jadhav
Ravikant Tupkar on Sanjay Raimulkar & Prataprao JadhavSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. अशात बुलढाण्यात राजकारण तापले आहे. हे राजकारण आता थेट धमकीपर्यंत गेले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या कानाखाली आवाज काढावा लागेल, असे आमदार संजय रायमुलकर यांनी जाहीर सभेतून म्हटले. रायमुलकरांच्या या वक्तव्याला तुपकरांनी प्रत्युत्तर देत असल्या पांचट धमकीला घाबरत नाही, असे स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच पक्षांचे नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त झाल्याचे बघायला मिळत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी राजकारण चांगलेच तापले आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात याचा प्रत्यय येत आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातल्या उकळी-सुकळी या गावात जाहीर सभा पार पडली. सभेतून आमदार संजय रायमुलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर टीका केली.

Ravikant Tupkar on Sanjay Raimulkar & Prataprao Jadhav
Buldhana News : तुपकरांच्या कानाखाली आवाज काढावाच लागेल; शिंदे गटातील आमदाराचं वादग्रस्त विधान

‘तुपकरांच्या सभेत घुसून त्यांच्या कानाखाली मारू,’ असे वादग्रस्त वक्तव्य आमदार रायमुलकर यांनी भरसभेतून केले. रायमुलकर यांनी रविकांत तुपकर यांच्या वकील असलेल्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांच्यावरही टीका केली. सभेला उपस्थित असलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनीही तुपकरांवर टीकास्त्र डागले. तुपकर यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तुपकर म्हणाले, आमदार संजय रायमुलकर आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आपल्याला गावागावांत लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. शहरातही लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. तरुणांचा, महिलांचा मोठा पाठिंबा आपल्याला मिळत आहे. यांच्या सभांना लोक गर्दी करीत नाहीत. त्यामुळेच ते असे बावचळल्यासारखे वागत आहेत. सुमोर 15 वर्षे आमदार राहिलेले रायमुलकर अशा खालच्या पातळीवर बोलत असतील, तर यावरून समजून घ्या की, त्यांचे संतुलन बिघडलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘आम्ही पण त्यांना अशाच पद्धतीने उत्तर देऊ शकतो. मात्र आमच्यावर असे संस्कार नाहीत. मी काही नावापुरता भूमिपुत्र नाही. मी शेतात काम करणाऱ्या खऱ्याखुऱ्या शेतकऱ्याचा पोरगा आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. नांगर कसा चालवायचा, वखर कसा हाणायचा, गोफण कशी फिरवायची, याचे धडे आम्ही घेतले आहेत. तुमच्या पांचट धमक्यांना मी कधीही घाबरत नाही,’ असे प्रत्युत्तर तुपकरांनी रायमुलकरांना दिले आहे.

‘दादागिरीच्या जोरावर राज्य मिळवता येत नसते. तुम्ही ज्या पद्धतीने दादागिरीची भाषा वापरत आहात. टोकाची भाषा वापरता, म्हणजे सरकारमधल्या लोकांना मस्ती आली आहे का? हे विचारण्याची वेळ खऱ्या अर्थाने आलेली आहे. एकच सांगतो सोयाबीन- कापसावर प्रश्न विचारणे किंवा सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढणे हा जर गुन्हा असेल तर असे हजारो गुन्हे करायला मी तयार आहे,’ असे तुपकर यांनी नमूद केले.

Ravikant Tupkar on Sanjay Raimulkar & Prataprao Jadhav
Buldhana LokSabha Constituency : शेतकऱ्यांना आधार वाटणारा युवा चेहरा ः रविकांत तुपकर

‘नेत्यांना आपण निवडून देतो, पण आमदार असो की खासदार, तुम्ही दिल्लीत काय केले? हे विचारण्याचा आम्हाला अधिकार आहेच. तो संविधानाने आम्हाला दिलेला आहे. तुम्ही नाकारू शकत नाही आणि आम्ही कधीही खालच्या पातळीवर यांच्यावर टीका केली नाही हे लक्षात ठेवा. पण अशा पद्धतीने जर का तुम्ही दादागिरीची भाषा वापरत असाल, तर गावगाड्यातील शेतकरी तुम्हाला जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा तुपकरांनी खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांना दिला आहे.

खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार रायमुलकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता बुलढाण्यात राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात आणखी हे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Ravikant Tupkar on Sanjay Raimulkar & Prataprao Jadhav
Lok Sabha Election 2024 : निवडणूक रिंगणात उतरलेले तुपकर आता करणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com