Ravikant Tupkar on Onion Rate : दोन लाख मेट्रिक टन म्हणजे दोनच दिवसांचा कांदा, उर्वरित मालाचे काय?

Onion Rate Dispute : हे म्हणजे केंद्र सरकारचा आणखी एक जुमला आहे.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama

Maharashtra Farmers News : कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर कहर म्हणजे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा वाणिज्य मंत्र्यांनी केली. हे म्हणजे केंद्र सरकारचा आणखी एक जुमला आहे, अशी घणाघाती टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली. (First withdraw the 40 percent export duty)

यासंदर्भात तुपकर म्हणाले, आम्ही कसे शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, हे दाखविण्यासाठी आज दोन लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विटंल दराने खरेदी करण्याचा निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी घोषित केला आहे. जर तुम्ही खरंच शेतकऱ्यांच्या बाजूने असता तर तुम्ही कांद्यावर निर्यात शुल्क लावलेच नसते. त्यामुळे खरंच शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर आधी ४० टक्के निर्यात शुल्क मागे घ्या.

केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे खरेदी करणार असलेला दोन लाख मेट्रिक टन कांदा हा तर मार्केट मध्ये येणारा केवळ दोन दिवसांचाच कांदा आहे. मग उर्वरित कांद्याचे काय? त्यातही ए ग्रेडचाच कांदा सरकार खरेदी करणार. जर केंद्र सरकार खरंच शेतकऱ्यांच्या बाजूचे असेल तर त्यांनी तातडीने लावलेले निर्यात शुल्क मागे घ्यावे व संपूर्ण मार्केट मध्ये येणारा कांदा खरेदी करावा, असेही तुपकर म्हणाले.

४० टक्के निर्यात शुल्क वाढीचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला नाही, तर केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्लीतील (Delhi) घरात कांदा फेकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा सणसणीत इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. कांद्यावरून सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारण पेटले आहे. त्यात तुपकरांनी सरकारला चांगलेच सुनावले आहे. ४० टक्के निर्यात शुल्क लादण्याचे शहाणपण सरकारला सुचले कसे, असा प्रश्‍न त्यांनी केला आहे.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar Vs Raju Shetti: शेट्टी - तुपकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी 'स्वाभिमानी'चं मोठं पाऊल; २६ ऑगस्टला होणार फैसला ?

ही सुपीक कल्पना सरकारच्या (Central Government) डोक्यात कुणी घातली? शहरी ग्राहक जगला पाहिजे, शहरी मतदार टिकला पाहिजे. म्हणून सरकारने ही आडमुठेपणाची भूमिका घेतली असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारचा आजचा निर्णय म्हणजे केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे, असेही रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com