Ravindra Chavan News : नितीन गडकरींच्या रूपात बघायला मिळाले बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण !

Chandrakant Patil : आता २४ तासांत महाराष्ट्र दर्शन होऊ शकणार आहे.
Shashikant Shinde, Ravindra Chavan and Nitin Gadkari
Shashikant Shinde, Ravindra Chavan and Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Legislative Council News : राज्यात रस्‍त्यांची कामे सुरू असताना लोकप्रतिनिधी ठेकेदाराकडे पैशाची मागणी करतात. ती पूर्ण केली नाही, तर अडवणूक करतात. हा मुद्दा आज सभागृहात शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. त्याला शशिकांत शिंदे यांनीही दुजोरा दिला. (Now Maharashtra will be able to visit within 24 hours to Ashtavinayak)

अलिबाग - रोहा रस्त्याच्या बाबतीत हेच झाले आणि मुंबई - गोवा मार्गही त्यामुळे रखडल्याचेही सभागृहात सांगण्यात आले. यावर अशा पद्धतीने कुणीही काम अडवत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. मग तो लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असेल, अगदी आमच्या पक्षाचा असेल तरी त्याच्यावर सरकार म्हणून जी कारवाई केली पाहिजे, ती करणार, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.

चंद्रकांत पाटील बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्रातील अष्टविनायक दर्शन २४ तासांत व्हावे, अशा रस्त्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटलांनी केला. तो पूर्ण झाला असून आता २४ तासांत महाराष्ट्र दर्शन होऊ शकणार आहे, असे सांगताना रवींद्र चव्हाण म्हणाले, हे काम दादांनी केले. अलिबाग - रोहा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा रस्ता आहे. तेव्हाच पूर्ण झाला असता तर फायदा झाला असता. पण हरकत नाही ‘देर आये दुरूस्त आये...’, असेही ते म्हणाले.

ठेकेदाराला पैसे मागून कामे थांबविणाऱ्या लोकप्रतिनिधींबाबत जयंत पाटील यांनी सभागृहात माहिती दिल्यानंतर ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना चीड आली आणि त्यांनी गय न करता कारवाई करण्याचा जो इशारा दिला, त्यावरून आज सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) असल्याचा भास होतो आहे, असे शशिकांत शिंदे म्हणाले. रवींद्र चव्हाण आज नितीन गडकरींच्या रूपात दिसले, असेही ते म्हणाले. फक्त जयंत पाटलांनी सभागृहाला त्या लोकप्रतिनिधींची नावे सांगायला पाहिजे होती, असेही ते म्हणाले.

Shashikant Shinde, Ravindra Chavan and Nitin Gadkari
Nitin Gadkari news Update: नितीन गडकरींना धमकी; बंगळूरमधून तरुणी ताब्यात..

लोकप्रतिनिधी ठेकेदाराला पैसे मागून अशीच कामे अडवत असतील, तर त्यावर बंधन आणणे गरजेचे आहे. याशिवाय काही ठेकेदार नियम तोडून आणि अधिकाऱ्यांशी संगनमत करून चुकीची कामे काम करत असतील. अधिकाऱ्यांना हाताशी धरून काम न करता किंवा अर्धवट कामे करून बिले काढत असतील, तर अशा अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com