Nagpur News : केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांना मंगळवारी (२१ मार्च) पुन्हा धमकी देण्यात आली. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात फोन करुन त्यांच्या 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने जयेश पुजारी असे नाव सांगितलं आहे.पण पुजारी हा आधीच हत्येच्या प्रकरणात बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत आहे.अशातच या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.
नितीन गडकरी यांना धमकी दिल्या प्रकरणी बंगळूर येथील एका तरुणीला ताब्यात घेण्यात आलं आहे. ही तरुणी बंगळुरू येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते. गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्याने एक नंबर देत या नंबरवर दहा कोटी रुपयांची खंडणी पाठवण्यास सांगितले होते. हा नंबरचा तपास केला असता हा नंबर बंगळूर एका तरुणीचा असल्याचे आढळून आले. तसेच, तिचा एक मित्र कारागृहात असल्याची माहिती तपासात समोर आली. या तरुणीला चौकशीसाठी मेंगलोर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, मंगळवारी (२१ मार्च) सकाळी दोन वेळा गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयातील लँडलाईनवर हे धमकीचे कॉल आले. या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या कॉलप्रकरणी त्यांच्या कार्यालयाने नागपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढही केली.
तर दुसरीकडे,जयेश पुजारीने नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना या पुर्वीही नागपूरच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली होती. खरतंर तो हत्येच्या प्रकरणात बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत आहे. शिवाय त्यानं जेलमधूनच अशा पद्धतीनं अनेकवेळा या अगोदरही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. यापूर्वी 2016 मध्ये तो जेल तोडून पळून गेला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.