नव्या वाहनांवरही वसुली, आरटीओकडून १५ हजारांची केली जाते मागणी...

आरटीओ (RTO) कार्यालयात आणि अधिकाऱ्यांच्या पुढ्यातच हा प्रकार झाला असतानाही अद्याप कार्यालयामार्फत (Office) त्याची तक्रार करण्यात आली नाही.
RTO Office, Nagpur.
RTO Office, Nagpur.Sarkarnama
Published on
Updated on

नागपूर : नव्या कोऱ्या आणि कंपनी इन बिल्ट व्यावसायिक वाहनांची गरज नसताना ब्रेक टेस्ट आणि योग्यता चाचणीच्या नावाखाली प्रत्येक वाहनाचे १५ हजार रुपये उकळले जात असल्याचा सर्रास वसुलीचा प्रकार नागपूर (Nagpur) आरटीओ (RTO) कार्यालयात सुरू आहे.

एक वाहनमालकाने यावर आक्षेप घेतला असता आरटीओ कार्यालयातील एका दलालाने त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. आरटीओ कार्यालयात आणि अधिकाऱ्यांच्या पुढ्यातच हा प्रकार झाला असतानाही अद्याप कार्यालयामार्फत त्याची तक्रार करण्यात आली नाही. वाहन मालकाने थेट फोनवरून पोलिसांना कळवल्यानंतर ट्रक वाहनचालक संघटनेच्यावतीने त्यांना तक्रार मागे घेण्यास लावली. नागपूर आरटीओ कार्यालयात झालेल्या घटनेचा आणि वाहन चालकांच्या संघटनेचा काही संबंध नसताना संघटनेचे कार्यकर्ते तत्काळ तेथे कसे पोहचले आणि मध्यस्थी करण्याचे कारण काय, अशा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वाहनचालक संघटनेच्या माध्यमातून आरटीओतील काही अधिकारी वाहन मालकांकडून वसुली करीत असल्याची चर्चाही आहे.

नवे वाहन असतानाही फिटनेस टेस्ट, ब्रेक टेस्ट तसेच योग्यता प्रमाणपत्रांची चाचणी करण्यासाठी वाहन आरटीओ कार्यालयात जमा करण्यास सांगितले जाते. तासनतास वाहनांना रोखून ठेवले जाते. अशा तक्रारी होत्या. याची दखल घेत परिवहन आयुक्तांनी २५ जानेवारी २०१९ रोजी एक स्पष्ट आदेश काढला आहे. नवे वाहन असल्यास ते आरटीओमध्ये जमा करण्याची व त्याची ब्रेक टेस्ट घेण्याची गरज नाही. ऑनलाइन शुल्क भरून वाहनांची नोंदणी करता येते. असे असतानाही आरटीओचे अधिकारी नवीन वाहन असतानाही आरटीओ कार्यालयात आणण्यास सांगतात.

टाटा आणि अशोक लेलँड या कंपन्या बॉडीसह पूर्ण स्वरुपाच्या वाहनांची निर्मिती करतात. याची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार व रितसर केली जाते. यासाठी लागणारे शुल्क आधीच जमा केले असतात. विक्रीनंतर ग्राहकांना याकरिता नोंदणीच्यावेळी योग्यता प्रमाणपत्र चाचणी शुल्क आकारण्याची गरज नसते. पूर्ण निर्मित वाहनांसाठी २२ क्रमांकाचा फॉर्म दिला जातो. याचा अर्थ कंपनीच्या माध्यमातूनच संपूर्ण संबंधित वाहन लोडेड असते. ‘२२ ए’ असा फॉर्म असल्यास कंपनीकडून फक्त वाहन घेण्यात आले. बॉडी बाहेरून बसवली असा त्याचा अर्थ होते. या वाहनांची चाचणी करणे आणि शुल्क घेण्याची परवानगी आहे. मात्र आरटीओ कार्यालयामार्फत सरसकट सर्वच वाहनांकडून पैसे उकळले जात आहेत.

RTO Office, Nagpur.
`आरटीओ`च्या अधिकाऱ्यांच्या बँक खात्यांचीही चौकशी?

धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न..

किसना मार्केटिंग इन्फ्रा कंपनीचे प्रकाश वंजारी यांनी अलीकडेच दोन व्यावसायिक वाहन खरेदी केले आहेत. नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयात गेले असताना त्यांना वाहन आणण्यास सांगितले. सोबतच शुल्क म्हणून १५ हजार रुपये भरावे लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी या संदर्भात शासनादेशाची माहिती संबंधित आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यास दिली. या दरम्यान येथे उपस्थित असलेल्या एका दलालाने त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.

वसुली एजंट?

नियम ४८बी अंतर्गत नोंदणीच्या वेळी अधिकृत विक्रेत्याने विकलेले पूर्ण इनबिल्ट वाहन प्रथमच नोंदणीच्या वेळी नोंदणी प्राधिकरणासमोर उपस्थितीत राहण्याची आवश्यकता नसते. नागरिकांना होणारा मनःस्ताप लक्षात घेता, आरटीओ कार्यालयातूनच वसुली एजंट ठिकठिकाणी पेरले असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com