Retired Police Officer News : काही नेत्यांनी दिली ‘गोली’, अन् सुधाकर अंभोरेंना लागले आमदारकीचे डोहाळे !

Chandrapur District : तेव्हा या जिल्ह्यातून घुग्घुस मार्गे चंद्रपुरात मद्यपुरवठा होतो, अशी चर्चा व्हायची.
Sudhakar Ambhore, Retired Police Officer
Sudhakar Ambhore, Retired Police OfficerSarkarnama
Published on
Updated on

Retired Police Officer News : सेवानिवृत्तीच्या दोन दिवस आधी एका ट्रॅव्हल्स चालकाला मारहाण करून वादात सापडलेले सेवानिवृत्त ठाणेदार सुधाकर अंभोरे यांना आता आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. मूळचे वाशीमचे असलेले अंभोरे यांना अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी देण्याची 'गोली' काही नेत्यांनी दिली. यामुळे अंभोरेंमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून अलिकडे त्यांचा चंद्रपूर शहरातील वावर वाढला आहे.

त्यांच्या उपस्थितीने मात्र आमदारकीचे डोहाळे लागलेल्या काँग्रेसच्या स्थानिक ‘सतरंजी छाप’ कार्यकर्त्यांत मात्र अस्वस्थता पसरली आहे. पोलिस दलातील आपल्या सेवेत अंभोरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात बराच काळ 'सेवा' दिली आहे. दारुबंदीच्या काळात ते घुग्घुसचे ठाणेदार होते. घुग्घुसला लागूच यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहे. तेव्हा या जिल्ह्यातून घुग्घुस मार्गे चंद्रपुरात मद्यपुरवठा होतो, अशी चर्चा व्हायची.

Sudhakar Ambhore, Retired Police Officer
Chandrapur Ambedkari Society : आंबेडकरी समाज तसा एकसंध, पण राजकारणात उडाली दाणादाण; कारण...

राज्यात तेव्हा भाजपची सत्ता होती. अंभोरे यांचे भाजपच्या नेत्यांशाही मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यानंतर त्यांना स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी मिळाली. तेव्हाही दारूबंदी होती. दारुबंदीच्या 'अर्थ'पूर्ण काळात ते चंद्रपूर पोलिस दलात महत्वाच्या पदावर होते. त्यानंतर त्यांची उचलबांगडी झाली. सेवेच्या शेवटच्या दिवसांत ते ब्रह्मपुरीत ठाणेदार होते. निवृत्तीच्या दोन दिवस आधी त्यांनी ट्रॅव्हल्स चालकाला मारहाण केली. तेव्हा अंभोरे खासगी वाहनात होते.

ते वाहन वणी येथील एका मटका किंगच्या नावावर असल्याचे समजते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे, असे ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. निवृत्तीनंतर अंभोरे यांना राजकारणाचे वेध लागले आहे. नागपूर अधिवेशन काळात त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. आता ते थेट काँग्रेसच्या मंचावरसुद्धा दिसायला लागले आहेत. त्यांनी चंद्रपुरात निवासासाठी घरसुद्धा बघितले आहे.

निवडणुकीच्या आधी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चारपाच लोकांना आमदारीकचे लालीपॅाप देणारी टोळी जिल्ह्यात कार्यरत आहे. त्यासाठी आर्थिक ताकद असलेली माणूस गळाला लावली जातात. जमेल तेवढे त्यांच्या खिशाला चुना लावून शेवटच्या क्षणी काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठीचा निर्णय अंतिम असतो, असे सांगून हात वर करतात. उमेदवारीच्या नादात हात पोळून घेतलेले अनेक जण आजही जिल्ह्यात सापडतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही चाणाक्ष टोळी प्रत्येक वेळी नवा भिडू गळाला लावते. यावेळी अंभोरे त्यांच्या हातात सापडले आहे. दुसरीकडे आज ना उद्या विधानसभेची तिकीट मिळेल, या आशेने मागे फिरणाऱ्या काही ‘सतरंजी छाप’ कार्यकर्त्यांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे. अंभोरेची उपस्थिती त्यांना चांगलीच खटकत आहे. परंतु तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केल्याशिवाय या पामरांसमोर सध्या तरी काही पर्याय नाही.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com