Lok Sabha Elections 2024 : विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन सुसाट धावणार

MNS News : विदर्भातील बुलढाणा, अमरावती, चंद्रपुरात उतरणार मैदानात
Lok Sabha Elections  2024  :  विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन सुसाट धावणार
Published on
Updated on

फहीम देशमुख

Lok Sabha Elections : विदर्भाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अखेर ठरले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बुलढाणा अमरावती आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांमध्ये मनसे मैदानात उतरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने बैठक आणि इतर हालचाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही सुरू केल्या आहेत. यामध्ये शनिवारी सायंकाळी शेगावात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने नेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर उंबरकर यांनी ही घोषणा केली.

मनसेची मागील महिन्याभरापासून राज्यातील लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकी पार पडत आहे. या बैठकीत लोकसभेच्या 22 जागांचा आढावा घेण्यात आला आहे. मनसे मुंबईत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काही जागांवरील संभाव्य उमेदावारांच्या नावावरदेखील शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यानंतर आता पक्षाने नियोजनासाठी विदर्भाकडे आपला मोर्चा वळविला असून याची सुरुवात शनिवारी संत नगरी शेगावातून करण्यात आली. मनसेच्या पार पडलेल्या बैठकीनंतर विदर्भातील बुलढाणा, अमरावती आणि चंद्रपूर या तीन ठिकाणी मनसे लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरणार असल्याचे मनसे नेते राजू उंबरकर यांनी जाहीर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Elections  2024  :  विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन सुसाट धावणार
Buldhana Sanjay Kute Politics : खासदारांसमोर घडलेल्या मानापमान नाट्यानंतर भडकले आमदार कुटे !

उंबरकर म्हणले की, पक्षातील फाटाफूट आता जनतेला नको आहे. आणि म्हणून आता जनतेच्या समोर एकमेव पर्याय आहे तो म्हणजे राज ठाकरेंचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. मग आता लोकसभा लढली पाहिजे या विषयावर एकमत झाले आहे आणि त्याच्यामध्ये बुलढाणा, अमरावती आणि चंद्रपूर अशा तीन लोकसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. याकरिता बैठक होती. बैठकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गावांमध्ये असणारे संघटन पाहता या विभागांमध्ये कायापलट होईल, या आम्हाला शंका नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात मोठी भरारी घेईल. या तीनही मतदारसंघात खासदार हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असेल. प्रत्येक गावातील व्यक्ती या मतदारसंघातला बैठकीमध्ये हजर होता. प्रत्येकाचे म्हणणे असे आहे की, आता यांचे त्यांचे दुकान चालवणे बंद करा. जनतेकडे आणि या महाराष्ट्राकडे त्या दिल्लीला जर झुकवायचे असेल तर एकमेव पर्याय आहे तो म्हणजे राज ठाकरे आणि राज ठाकरेंशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही, असे गावागावातून ऐकायला येत आहे. विदर्भात मोठे यश राज ठाकरे यांना मिळेल, असा विश्वास मनसे नेते राजू उंबरकर यांनी व्यक्त केला.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी लवकरच मनसे प्रमुख राज ठाकरे उमेदवार देणार असल्याची माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिली आहे. बैठकीत संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, सहकार सेलचे राज्य उपाध्यक्ष राजू पळसकर, जिल्हा प्रमुख गणेश बरबडे चिखली, जिल्हा प्रमुख लक्ष्मण जाधव मेहकर, जिल्हा प्रमुख अमित देशमुख यांच्यासह अमोल रिंढे पाटील, शैलेश गोंधने, रवींद्र उन्हाळे, भागवत उगले, पंकज पाटील, विनोद टिकार, जिल्ह्यातील शहर प्रमुख व तालुकाप्रमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Lok Sabha Elections  2024  :  विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन सुसाट धावणार
Buldhana News: दोन गटात हाणामारी; 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष जखमी...

राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या भरोशावरच इतर राजकारणी सत्ता काबीज करतात. त्यांना यशही येते मात्र कोठे ना कोठे आपण मागे राहतो. त्यामुळे आता यांचे त्यांचे दुकाने चालवणे बंद करा, असा सूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे दौरे विदर्भात सुरू झाले आहेत. त्याअनुषंगाने शेगावात पार पडलेल्या बैठकीमध्ये खेडे-गावातील अनेक कार्यकर्त्यांनी उभे राहून आपल्या मनातील मत पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केले. यावेळी मनसेसैनिकांच्या भावना राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील अशा विश्वास मनसे नेते उंबरकर यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Edited By : Prasannaa Jakate

Lok Sabha Elections  2024  :  विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन सुसाट धावणार
Buldhana Politics : राजकारण तापले! तुपकर म्हणाले, कानाखाली आवाज काढण्याच्या पांचट धमकीकडे लक्ष देत नाही!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com