Rohit Pawar : रोहित पवारांचा रोख फडणवीसांकडे ? " आता महाराष्ट्र धर्म’ संपवण्याचे काम आधुनिक ‘अनाजी पंत’..."

Yuva Sangharsh Yatra : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
Rohit Pawar, Devendra Fadnavis
Rohit Pawar, Devendra FadnavisSarkarnama

Pune News : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनाजी पंत म्हणून उल्लेख केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गटाचे ) नेते रोहित पवारांनीदेखील महाराष्ट्र धर्म’ संपवण्याचे काम आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहे, सांगत फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवासंघर्ष यात्रा काढली आहे. या  यात्रेदरम्यान  शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही फोटो आणि व्हिडिओ एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar, Devendra Fadnavis
Vijay Auti vs Nilesh Lanke : 'तुमचा पक्षच अस्तित्वात कुठे'; विजय औटींनी अजित पवार गटाच्या नेत्यांना डिवचलं !

या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, " युवा संघर्ष यात्रेनिमित्त साडेचारशे किलोमीटरचा प्रवास केल्यावर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका ‘अनाजी पंत’ने संपवली, आताच्या काळामध्ये ‘महाराष्ट्र-धर्म’ संपवण्याचे काम एक आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहेत," त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, याची चर्चा सध्या सुरू आहे.

कोण होते अनाजी पंत ?

दरम्यान, अनाजी पंतांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात आढळतो. अनाजी पंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज यांना बंदी बनवण्यासाठी घाट घातल्याचे इतिहासात म्हटले आहे. त्यामुळे संभाजी महाराजांनी अनाजी पंतांना संभाजी राजेंनी हत्तीच्या पायी दिल्याने इतिहासकार म्हणतात.

Rohit Pawar, Devendra Fadnavis
NCP Crisis : तब्बल 260 पानांचं उत्तर, अजित पवार गटाचा पुन्हा 'राष्ट्रवादी'वर दावा, म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com