RSS Meeting : राम मंदिरासह लोकसभा निवडणुकीपूर्वी संघाच्या प्रांत बैठकीत विचारमंथन

Reshimbag : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती
RSS Bhavan Reshimbag Nagpur.
RSS Bhavan Reshimbag Nagpur.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Politics : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि आगामी काळातील लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रांतस्तरावरील महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (ता. 15) नागपूर येथे पार पडली. सकाळी नऊ वाजतापासून संघाच्या रेशीमबाग येथील कार्यालयात या बैठकीत गहन विचारमंथन करण्यात आले.

बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. रेशीमबाग येथील संघ कार्यालयात संघाचे प्रचारक, प्रांत प्रचारकांसमवेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

RSS Bhavan Reshimbag Nagpur.
#shorts : मोहन भागवतांची अंबाबाईच्या दरबारात हजेरी | Mohan Bhagwat | RSS

अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात हा पर्व दीपोत्सवाच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने असलेल्या पूर्वतयारीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. येत्या दोन महिन्यात केव्हाही निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे संघ आणि संघाशी संबंधित संघटनांकडून भाजपला कशी मदत करता येईल, यावरही उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपकडून करण्यात आलेले सर्वेक्षण आणि संघाच्या स्वयंसेवकांनी संकलित केलेली माहिती याबाबतही बैठकीत साधकबाधक चर्चा करण्यात आली. मकरसंक्रांतीच्या दिवशी ही बैठक झाल्याने संघाच्या परंपरनेप्रमाणे बैठकीला उपस्थित सर्वांनी एकमेकांना मकरसंक्रमण पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. नेहमीप्रमाणे या बैठकीबाबतही संघ आणि भाजपच्या नेत्यांकडून गुप्तता बाळगण्यात आली. भाजपच्या नेत्यांनीही बैठकीबाबत सविस्तरपणे भाष्य करणे टाळले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रचारक आणि स्वयंसेवकांना श्रीराम मंदिर लोकार्पण आणि निवडणुकीच्या काळात कोणती कामे करायची आहेत, यासंदर्भातील सूचना संघाकडून प्रांतातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. भाजपच्या नेत्यांकडून संघाचे प्रचारक आणि स्वयंसेवकांना योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे अशा सूचनाही पक्षाच्या नेत्यांना करण्यात आली. लोकसभा निवडणुकीला अद्याप काहीसा अवकाश असला तरी संभाव्य उमेदवार कोण असू शकतात याचे चित्र बऱ्याच ठिकाणी स्पष्ट आहे. अशा उमेदवारांना संघ आणि भाजप दोन्हीकडून पसंती दर्शविण्यात आली आहे. अशा संभाव्य उमेदवारांना संघाकडून मदत केली जाणार आहे. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या दिवशी साेमवारी झालेली आजची ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. अशात प्रचारकार्य करताना संघाच्या स्वयंसेवकांना भेडसावत असलेल्या अडचणींबाबत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा केली. संघासोबतच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर संलग्नित संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना होणारा त्रास कसा दूर करता येईल, यावरही काही वेळ बैठकीत चर्चा झाली.

Edited By : Atul Mehere

RSS Bhavan Reshimbag Nagpur.
RSS Meeting : मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर संघाच्या बैठकीत विचारमंथन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com