Akola Political News: प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात संभाजीराजेंच्या 'स्वराज्य'ची मोर्चेबांधणी !

Sambhajiraje Chhatrapati & Prakash Ambedkar : '' संभाजीराजेंचे नेतृत्व व्यवस्थेला ताळ्यावर आणेल...''
Sambhajiraje Chhatrapati & Prakash Ambedkar
Sambhajiraje Chhatrapati & Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Akola News: माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटना स्थापन केली. त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून 2024 च्या सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. याचाच भाग म्हणून पक्षविस्तार आणि बांधणीलाही सुरुवात केली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ला समजला जाणाऱ्या अकोला जिल्ह्यातही स्वराज्य पक्षानं तगडं आव्हान उभं करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.

स्वराज्य संघटनेचे (Swarajya Sanghatana) राज्य सचिव आणि विदर्भ प्रभारी भुजंग काळे यांनी गुरुवारी अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करतानाच स्वराज्य पक्षाचा लवकरच जिल्ह्यात विस्तार होणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.

Sambhajiraje Chhatrapati & Prakash Ambedkar
Akola ShivSena News: ठाकरेंना विदर्भात धक्का ; अकोल्याच्या माजी जिल्हाप्रमुखांचा शनिवारी शिंदे गटात प्रवेश

काळे म्हणाले, राजकारणाच्या नावाखाली सामान्य माणसाला लुटण्याचे आणि त्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे,त्याला जनता कंटाळली असून छत्रपती संभाजीराजे यांच्या रुपात आता प्रभावी नेतृत्व मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

'' संभाजीराजेंचे नेतृत्व व्यवस्थेला ताळ्यावर आणेल...''

छत्रपती संभाजीराजे(Chhatrapati Sambhajiraje) यांच्या आदेशाने गुरुवारी स्वराज्य पक्षाची प्राथमिक बैठक स्थानिक शासकीय विश्रामगृहात पार पडली. त्यावेळी काळे बोलत होते. स्वराज्य पक्षाला विदर्भात तरुणवर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळत असून कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या तेजस्वी तरुणाईला प्राधान्य देण्यावर आमच्या पक्षाचा भर असून साक्षात संभाजीराजे यांचे नेतृत्व ग्रामीण तरुणाईला न्याय देऊन व्यवस्थेला ताळ्यावर नक्कीच आणेल असा विश्वासही भुजंग काळे यांनी व्यक्त केला.

Sambhajiraje Chhatrapati & Prakash Ambedkar
Supriya Sule On Ajit Pawar : '' अजितदादा आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीमध्ये फूट नाही!''; सुप्रिया सुळेंचा मोठा दावा

स्वराज्य पक्षाचा पहिला वर्धापन दिन...

स्वराज्य पक्षाचा पहिला वर्धापन दिन येत्या 27 ऑगस्ट रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी 10 वाजता होणार असून त्याला विदर्भातील 5 हजारावर मावळे उपस्थित राहतील असेही काळे यावेळी म्हणाले. यावेळी इंद्रजित देशमुख,आकाश दांदळे उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com