RTO News : ज्याच्यावर गोळीबार झाला तो संकेत आणि गोळीबार करणाऱ्या मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर विभागाची मेहेरनजर आता सामान्य लोकांनाही खटकू लागली आहे. डीपार्टमेंटची येवढी बदनामी होत असतानाही शेजवळ यांना साधी नोटीस विभागाने दिलेली नाही. ही बाब आता अनेकांना खटकू लागली आहे.
मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड गोळीबार प्रकरणात खुनाचा प्रयत्न करण्याच्या कलमाखाली आरोपी असलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांचा जामीन अर्ज रद्द केल्यावर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, या प्रकरणाबाबत पोलिसांनी सूचना देऊनही आरटीओकडून कारवाई होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे, आरटीओला त्यांच्याविषयीची माहितीही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे वरिष्ठांची मेहेरबानी त्यांच्यावर असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
संकेत गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर नागपुरातील बजाजनगर येथे गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांच्यासह संकेत गायकवाड आणि संबंधितांना चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र, गीता शेजवळ या चौकशीला हजर झाल्या नाहीत. याशिवाय त्या अद्यापही फरार आहेत. विशेष म्हणजे, त्या फरार असताना, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता. मात्र, दोन्ही न्यायालयांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. असे असताना, त्यांच्यावर अनेक प्रकरणामध्ये गुन्हे दाखल असताना आरटीओकडून त्यांच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. आता याही प्रकरणात, त्या गेल्या एक ते दोन महिन्यांपासून कार्यालयात गैरहजर आहेत. मात्र, त्याबाबत साधी कारणे दाखवा नोटीस त्यांना अद्याप कार्यालयातून बजावण्यात आलेली नसल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची नोंद घेत, त्याबाबत विभागाकडेही माहिती देण्यात आलेली नसल्याचे समजते. याउलट या प्रकरणाबाबत माहिती नसल्याचे कार्यालयातील प्रमुखांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आरटीओमधील वरिष्ठ अधिकारीच, त्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आता विभागात रंगू लागली आहे. गीता शेजवळ यांची ‘पोहोच’ ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफीस आणि त्याहीउपर असल्याची कुजबुज विभागात आहे. अन्यथा कमिशनर ऑफीसमधून तरी त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई व्हायला पाहिजे होती, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.