Took bribes from RTO : गीता शेजवळ अद्यापही फरारच; निवासस्थानांची घेतली झडती !

ACB : एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर शेजवळांसह तिघेही पसार झाले.
Bribes Taken From Lady RTO Officer.
Bribes Taken From Lady RTO Officer.Sarkarnama

Lady RTO Officer Taken Bribes : रामटेकमधील कांद्री येथील आरटीओच्या चेकपोस्ट परिसरात चारशे रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता भास्कर शेजवळ आपल्या दोन साथीदारांसह अद्यापही फरार आहेत. (Four teams are on the lookout for the three including the Shejwal)

एक ट्रकचालकाकडून मुकुंद व राजेश याने शेजवळांसाठी शुक्रवारी (ता. ५) लाच घेतली होती. एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर शेजवळांसह तिघेही पसार झाले. शेजवळ तसेच मुकुंद सोनकुसरे व राजेश भातखोरे या तिघांचा अद्यापही एसीबीला शोध लागलेला नाही. याबाबत अमरावती व नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांची चार पथके फरार शेजवळांसह तिघांचा शोध घेत आहेत.

शेजवळ यांनी मध्यस्थाच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्याचीही चर्चा आहे. दरम्यान पथकांनी नागपूर (Nagpur)(Solapur) सोलापूर येथील निवासस्थानांची झडती घेतली. झडतीत एसीबीच्या पथकालाही काहीही आढळून आले नसल्याची माहिती आहे. वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचा आरोप केल्याने मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ चर्चेत आल्या होत्या.

ट्रक पासिंगसाठी चालकांकडून रक्कम उकळली जात असल्याची तक्रार लातूर (Latur) जिल्ह्याच्या चाकोट तालुक्यातील रहिवासी असलेला ट्रकचालक विकास केदार (वय २४) याने गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) डीजी कार्यालयात दिली होती. त्याआधारे त्याच रात्री सापळा रचण्यात आला. योजनेनुसार लाचलुचपत विभागाकडून एका ट्रकचालकाला पाठविण्यात आले. शेजवळ यांनी तडजोडीअंती ४०० रुपयांची लाचेची रक्कम त्यांच्या हस्तकांमार्फत स्वीकारली होती. त्यानंतर शेजवळ व त्यांचे दोन साथीदार फरार झाले होते, ते अद्यापही फरारच आहेत.

Bribes Taken From Lady RTO Officer.
Nagpur District APMC Analysis : सहकारात कॉंग्रेसचा दबदबा कायम, भाजपला आणखी एक संधी !

मोटार वाहन निरीक्षक (RTO) शेजवळ यांनी सोनकुसरे व भातखोरे यांची नियुक्ती अवैध वसुलासाठी केली होती. शासकीय इमारतीतील कक्षामध्ये त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. शेजवळ यांच्या ड्युटीच्या काळात हे दोघे ट्रकचालकाकडून रक्कम उकळत होते.

एखाद्या चालकाने पैसे देण्यास नकार दिल्यास शेजवळ हिला बोलावून घेतले जात होते. एसीबीकडून पाठविण्यात आलेल्या चालकाकडे या दोघांनी रकमेची मागणी केली. पण, त्याने रक्कम देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे नेहमीप्रमाणे शुक्रवारीही शेजवळला बोलावून घेण्यात आले होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com