पोलिसांनी नाही सोडले : काँग्रेस मुख्यालयातूनच विरोधी पक्षनेत्याला अटक

पोलिसांनी साजीद खान पठाण यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
Congress Leader Sajid Khan Pathan
Congress Leader Sajid Khan Pathansarkarnama

अकोला : अकोला (Akola) महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या प्रभाग रचेनवरून काँग्रेस (congress) नेत्यांनी वाद घातला. तसेच मनपा कर्मचाऱ्यांना तीन तास वेठीस धरत शिविगाळ केली. त्यामुळे काँग्रेसचे गटनेते तथा महापालिकेतील विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण (Sajid Khan Pathan) यांना चांगलेच महागात पडले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच दिवसांनी पठाण यांच्यासह तिघांना काँग्रेसचे जिल्हा मुख्यालय असलेल्या स्वराज्य भवन येथून सिटी कोतवाली पोलिसांनी (police) ताब्यात घेतले.

साजीद खान पठाण यांनी नगररचनाकार संदीप गावंडे व उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते यांना तीन तास कक्षात बसवून ठेवत प्रश्नाचा भडिमार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ मनपा कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी साजीद खान पठाण यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मनपा उपायुक्त डॉ. पंकज वसंतराव जावळे यांनी या प्रकरणी तक्रार केली होती.

Congress Leader Sajid Khan Pathan
निवडणूक मुदतीत नाही : सेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेवर प्रशासक येणार

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी साजिद खान पठाण, मोहम्मद इरफान, नगरसेवक मोंटू खान, महेंद्र डोंगरे, नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर, नौशाद खान, गुड्डू पठाण, जमीन बर्तनवाले, फिरोज खान नवाब उर्फ बाबा यांच्याविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १५३ अ, १८६, १८८, २६९, ३२३, ३४२, ३५३, ४२७, ५०४, ५०६ (२), महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १३५, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम तीन नुसार गुन्हा दाखल केला होता. शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बुधवारी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू व त्यांच्या पथकाने साजिद खान पठाण, मोहम्मद इरफान, मोंटू खान यांना अटक केली.

काँग्रेस मुख्यालयातील बैठकीला हजेरी व पोलिसांची कारवाई

भाजप कार्यालयासमोर काँग्रेस नियोजित आंदोलन. प्रदेश काँग्रेसने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेतील काँग्रेसचा गटनेता बदलण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीसाठी साजिद खान पठाणसह इतर गुन्हे दाखल असलेले नगरसेवक मुख्यालयात आले होते. पोलिसांनी थेट स्वराज्य भवन गाठले. बैठकीमुळे तब्बल तासभर पोलिसांना तात्कळ ठेवण्यात आले. अखेर तीन वाजताच्या सुमारास पोलिस निरीक्षक कडू व त्यांच्या पथकाने साजिद खान यांच्यासह तिघांना ताब्यात घेतले. साजिद खान यांच्यावर गुन्हा दाखल होताच काँग्रेसने त्यांच्या डोक्यावरील हात काढून घेतला.

Congress Leader Sajid Khan Pathan
दोन कॅबिनेट मंत्र्यांसह ज्येष्ठ नेत्यांना तुरूंगात टाकण्याची ईडीची तयारी; राऊतांचा गौप्यस्फोट

बस स्थानक चौकापर्यंत गेले पायी चालत

काँग्रेस मुख्यालय असलेल्या स्वराज्य भवन येथे आयोजित बैठकीनंतरच पोलिसांनी पठाण, मो. इरफान व मोंटू खान या तिघांना ताब्यात घेतले. मात्र, काँग्रेस मुख्यालयात अटक करू नका असे सांगून तिघेही पोलिसांसोबत बस स्थानक चौकापर्यंत पायी चालक गेले. काँग्रेस मुख्यालय परिसरातून बाहेर पडल्यानंतर तिघेही पोलिसांच्या गाडीत बसले. यावेळी पठाण यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com