Chandrapur : करचुकवेगिरी प्रकरणी 'वेकोलि'चे कार्यालय ग्रामपंचायतीकडून सील

Action on WCL : पंचायत समितीच्या मदतीने केलेल्या कारवाईमुळे खळबळ
Gram Panchayat Team Sealing WCL Pauni Sub Area Office in Chandrapur.
Gram Panchayat Team Sealing WCL Pauni Sub Area Office in Chandrapur.Sarkarnama
Published on
Updated on

Pauni : तब्बल सात वर्षांपासून 14 कोटी 88 लाख रुपयांचा कर थकविणाऱ्या पवनी येथील वेस्टर्न कोल फिल्ड अर्थात वेकोलिचे (WCL) कार्यालय बुधवारी सील करण्यात आल्याचे चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बल्लारपूर वेकोलिअंतर्गत येणाऱ्या पवनी सबएरिया कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली.

वारंवार मागणी करूनही कराच्या रकमेचा भरणा न केल्याने राजुरा पंचायत समितीच्या मदतीने साखरी ग्रामपंचायतीने कार्यालयाला कुलून ठोकले. या प्रकारानंतर डब्ल्यूसीएल प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली.

Gram Panchayat Team Sealing WCL Pauni Sub Area Office in Chandrapur.
Chandrapur : मनोज जरांगे पाटलांना अटक करा; ओबीसी परिषदेत ठराव मंजूर

राजुरा तालुक्यात बल्लारपूर वेकोलिअंतर्गत कोळसा खाणींचे मोठ्या प्रमाणात जाळे आहे. यातील पवनी कोळसा खाणीच्या करापोटी साखरी ग्रामपंचायतचा 2016 पासून 14 कोटी 88 लाखाची रक्कम वेकोलिकडे थकीत आहे. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने गृहकर भरण्याबाबत वारंवार वेकोलिकडे पाठपुरावा केला. मात्र त्याला वेकोलि प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. थकीत कराची रक्कम मोठी असल्यामुळे ग्रामपंचायतच्या विकासकामांचे गणित बिघडले. त्यामुळे ग्रामपंचायतीने ही बाब जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे याबाबत सुनावणी झाली. त्यांनी कराचा भरणा करण्याबाबत विस्तार अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. आकारण्यात आलेला कर योग्य असून त्यानुसार रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीच्या आधारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशांनुसार राजुरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, विस्तार अधिकारी रवी रत्नपारखी, ग्रामसेवक वंदना माथरकर, सरपंच प्रणाली मडावी यांच्यासह कारवाईला प्रारंभ केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आदेशात नमूद केल्याप्रमाणे थकित कराचा भरणा न केल्याने बल्लारपूर वेकोलिअंतर्गत येणारे पवनी सबएरिया कार्यालय सील करण्यात आले. बल्लारपूरच्या वेकोलि कार्यालयाकडे धोपटाळा, सास्ती व गोवरी ग्रामपंचायतींचाही सुमारे 50 कोटींचा कर थकीत असल्याची माहिती संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी दिली. ही रक्कम वेळेवर मिळाली असती तर, गावातील विकासकामांना चालना देता आली असती असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाईनंतरही वेकोलि प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेकोलिकडून जोपर्यंत कराच्या रकमेची भरणा होत नाही, तोपर्यंत कार्यालयाचे सील काढता येणार नाही, असे पंचायत समिती अधिकाऱ्यांनी वेकोलि प्रशासनाला कळविले आहे. कार्यालयच सील झाल्याने सध्या सबएरिया इमारतीमधील वेकोलिचे कामकाज ठप्प झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खाणींमध्ये प्रत्यक्ष काम चालते तर अशा कार्यालयांमधून प्रशासनाशी संबंधित कार्यालयीन कामे केली जातात, असे सांगण्यात आले.

Edited by : Prasannaa Jakate

Gram Panchayat Team Sealing WCL Pauni Sub Area Office in Chandrapur.
Chandrapur Bank Scam : चंद्रपूर जिल्हा बँकेच्या बडतर्फ कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; चिठ्ठीत बड्या बॅंक पदाधिकाऱ्यांची नावे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com