Akola ShivSena News: ठाकरेंना विदर्भात धक्का ; अकोल्याच्या माजी जिल्हाप्रमुखांचा शनिवारी शिंदे गटात प्रवेश

ShivSena News: शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर शनिवारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
Srirang Pinjarkar News
Srirang Pinjarkar NewsSarkarnama

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी अकोला जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर हे शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाणे येथे हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. गेले काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटात अकोला (Akola) जिल्ह्यामध्ये फुट पडणार असल्याची चर्चा होती. पिंजरकर यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे त्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.

माजी जिल्हाप्रमुख पिंजरकर हे शिंदे गटाच्या संपर्कात असून, ते लवकरच जाहीर प्रवेश करणार असण्याची शक्यता वर्तवली जात होती. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. शिंदे गटाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक रामेश्वर पवळ यांच्या समन्वयातून पिंजरकर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Srirang Pinjarkar News
Kolhapur Sharad Pawar Politics: पवारांच्या सभेला मुश्रीफ कार्यकर्ते पाठवणार? नेमकं काय म्हणाले मुश्रीफ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश होणार आहे. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातील काही माजी पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि काही सरपंच सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती पिंजरकर यांनी दिली.

Srirang Pinjarkar News
Raju Shetti News : कारखानदार लोकसभा-विधानसभेला पैसा उधळतील ; राजू शेट्टींनी उपसले आंदोलनाचे हत्यार

पिंजरकर यांच्यासोबत असंख्य कार्यकर्तेही प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. मात्र, या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी खुद्द मुख्यमंत्री शिंदे हे लवकरच अकोला येथे येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे प्रदेश समन्वयक रामेश्वर पवळ यांनी दिली आहे. पिंजरकर यांच्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांना विदर्भात धक्का बसला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com